शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आधार नाही, तर आहार नाही!

By admin | Updated: July 12, 2017 02:38 IST

आले सरकारच्या मना, तिथे कोणाचे चालेना...असेच सध्या सुरू आहे. सरकारी योजनाच्या यशस्वी क्रियान्वनासाठी आधार कार्ड

सरकारच्या धोरणाचा गरिबांना फटका : तांड्या-पाड्यावर जगणाऱ्या गरीब, अज्ञानी लोकांची थट्टा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आले सरकारच्या मना, तिथे कोणाचे चालेना...असेच सध्या सुरू आहे. सरकारी योजनाच्या यशस्वी क्रियान्वनासाठी आधार कार्ड आवश्यक करण्यात आले असेल तरी ते नेमके कुठेकुठे आवश्यक करावे, याचे पुरते ज्ञान सरकारला नसल्याने त्याचा फटका गरीब, निरक्षर लोकांना बसत आहे. याच क्रमात आता सरकारने अंगणवाडीच्या माध्यमातून पोषण आहार देताना आधाराची अट टाक ली आहे. आधार नाही, तर आहार नाही अशी भूमिका सरकारने घेतल्याने तांडया-पाडयावर जगणाऱ्या हजारो गरीब मुलांना पोषण आहाराला मुकावे लागणार आहे. शून्य ते सहा वयोगटातील बालकांना अंगणवाडीच्या माध्यमातून पोषण आहार दिला जातो. अंगणवाडीत येणारे बहुतांश बालक हे झोपडपट्टीत, मागास भागातून येत असतात. पालकांमध्ये असलेला अशिक्षितपणा, अज्ञान यामुळे त्यांच्या पालकांकडे सुद्धा आधार कार्ड उपलब्ध नसते. अशात शासनाने आधारची अट टाकल्याने, मुलांना पोषण आहार देणार कसा, असा सवाल अंगणवाडी सेविकांकडून विचारला जात आहे. अंगणवाडीच्या बाबतीत शासनाचे धोरणच उदासीन आहे. महिला व बाल कल्याण विभागाच्या एकात्मिक बाल विकास योजनेंतर्गत अंगणवाड्या चालविण्यात येतात. शून्य ते सहा वयोगटांच्या बालकांना पोषण आहार, पूर्व प्राथमिक शिक्षण येथून देण्यात येते. त्याचबरोबर गरोदर माता, किशोरवयीन मुलींचे पोषण अंगणवाडीच्या माध्यमातून करण्यात येते. अंगणवाडी सेविका आणि मदतनिस यांच्या माध्यमातून अंगणवाड्याचे काम चालते. अंगणवाडीत काम करणाऱ्या दोन महिलांना पोषण आहार, पूर्व प्राथमिक शिक्षण याबरोबरच जनगणना, लसीकरण, नवजात मुलांची माहिती, बीएलओचे काम, पेन्शन कार्य, ओळख पत्र आदी कामे करवून घेतली जातात. अशात आता सरकार अंगणवाड्यांचे खाजगीकरण करण्याच्या प्रयत्नात आहे. याला अंगणवाडी सेविकांचा विरोध आहे.