शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

-तर वेतनवाढही मिळणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 01:25 IST

शासन निर्णयानुसार महापालिकेने वेळोवेळी परिपत्रक काढून कर्मचारी व अधिकाºयांना एमएससीआयटी करण्याचे आवाहन केले होते. परंतु अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने महापालिकेने परिपत्रक काढून वेतनवाढ रोखण्याचा इशारा दिला होता.

ठळक मुद्दे ‘एमएससीआयटी’ची अट : मनपा कर्मचाºयांना अखेरची संधी, ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासन निर्णयानुसार महापालिकेने वेळोवेळी परिपत्रक काढून कर्मचारी व अधिकाºयांना एमएससीआयटी करण्याचे आवाहन केले होते. परंतु अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने महापालिकेने परिपत्रक काढून वेतनवाढ रोखण्याचा इशारा दिला होता. यामुळे कर्मचाºयांमध्ये असंतोष पसरल्याने एमएससीआयटी हा संगणक अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आता येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे़ त्यानंतर जे अधिकारी, कर्मचारी हा अभ्यासक्रम पूर्ण करणार नाही, त्यांची वेतनवाढ थांबविली जाईल़ शिवाय यापूर्वी ज्यांना वेतनवाढ मिळाली आहे, त्यांच्याकडून वाढीव रक्कम परत घेतली जाणार आहे़ याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी १५ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.संगणक साक्षरता ही आता अनिवार्य बाब झाली आहे़ नागपूर महापालिकेने वर्ष २००७ मध्ये यासंदर्भातील एक परिपत्रक काढले होते. त्यानुसार महापालिकेच्या अधिकाºयांना व कर्मचाºयांना संगणक प्रशिक्षण घेणे बंधनकारक होते. परंतु, अधिकारी, कर्मचाºयांनी या आदेशाकडे पाठ फिरविली. आता तब्बल १० वर्षांनंतर महापालिकेला या निर्णयाची आठवण झाली. प्रशासनाने गत ३० मार्च रोजी १०४ कर्मचारी, अधिकाºयांना पदोन्नती दिली होती़ त्यावेळी हा मुद्दा ऐरणीवर आला़, नंतर प्रशासनाने एमएससीआयटी अनिवार्य असल्याचे परिपत्रक काढले़ यातून ५० वर्षांवरील कर्मचारी व अधिकाºयांना सूट देण्यात आली़ जे कर्मचारी एमएससीआयटी प्रशिक्षित नाही, परंतु वय ५० वर्षे पूर्ण झाले असेल अशांना पदोन्नतीने वेतनवाढीचा दिलासा मिळाला होता़ मात्र, यातील ज्या कर्मचाºयांना वेतनवाढ वयाच्या चाळीसाव्या वर्षी मिळाली असेल तर त्यांना १० वर्षांत मिळालेली वेतनवाढ परत करावी लागणार होती़ यामुळे अधिकारी, कर्मचाºयांमध्ये असंतोष पसरला होता़ त्यामुळे आता एमएससीआयटी संगणक प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़या कालावधीत जे अधिकारी, कर्मचारी अभ्यासक्रम पूर्ण करणार नाही, त्यांची वेतनवाढ थांबविली जाईल़ तर ज्यांना आधीच वेतनवाढ मिळाली आहे, त्यांची वेतनवाढ परत घेतली जाणार आहे़ सामान्य प्रशासन विभागाने हा प्रस्ताव तयार केला आहे़ १५ सप्टेंबर रोजी होणाºया महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे़