शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
धोनीचा 'कॅप्टन कूल' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
4
१००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
5
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
6
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
7
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
8
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!
9
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
10
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
11
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
12
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
13
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
14
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
15
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
16
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
17
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
18
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
19
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
20
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...

सोशल मीडियावर वाघाचे छायाचित्र नको!

By admin | Updated: June 18, 2017 02:13 IST

अलीकडे जंगलात व्याघ्रदर्शन होताच, त्याचे छायाचित्र दुसऱ्याच क्षणी सोशल मीडियावर अपलोड होते.

एनटीसीएचा आक्षेप : वन विभागाला लेखी सूचना संजय रानडे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अलीकडे जंगलात व्याघ्रदर्शन होताच, त्याचे छायाचित्र दुसऱ्याच क्षणी सोशल मीडियावर अपलोड होते. यातून त्या वाघाचे स्थळ (लोकेशन) माहीत होते. हा त्या वाघासाठी फार मोठा धोका आहे, असे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) स्पष्ट करू न, सोशल मीडियावर येणाऱ्या वाघांच्या छायाचित्रांवर आक्षेप घेतला आहे. यासंबंधी एनटीसीएचे सहा. महानिरीक्षक डॉ. वैभव माथूर यांनी अलीकडेच १७ जून रोजी सर्व राज्यांच्या मुख्य वन्यजीव रक्षकांना पत्र जारी केले आहे. यात त्यांनी फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर येणाऱ्या वाघांच्या छायाचित्रांवर तीव्र आक्षेप नोंदविला आहे. त्यांच्या मते, एनटीसीएकडे अशा वाघांच्या छायाचित्रांविषयी माहिती प्राप्त झाली आहे. त्यामध्ये अनेक छायाचित्र कॅमेरा ट्रॅपचे सुद्धा आहेत. त्या छायाचित्रातून वाघाच्या अधिवासाची (ठिकाण) माहिती सार्वजनिक होते. शिवाय ती माहिती शिकाऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकते. यातून वनगुन्हे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. माहिती सूत्रानुसार नुकत्याच संपलेल्या उन्हाळ्यात विविध राष्ट्रीय उद्याने आणि व्याघ्र प्रकल्पातील वाघांची शेकडो छायाचित्रे सोशल मीडियावर आली आहेत. यात अनेकदा स्वत: गाईड आणि जिप्सी ड्रायव्हरनी व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकवर अशी छायाचित्रे टाकली आहेत. तसेच अनेक ग्रुपवर सुद्धा वाघाच्या छायाचित्रांसह तो दिसून आलेल्या ठिकाणांची माहिती दिली जाते. एवढेच नव्हे, तर अनेकदा स्वत: वनरक्षक आणि वन परिक्षेत्र अधिकारी सुद्धा त्यांच्या वन परिक्षेत्रात दिसलेल्या वाघाचे छायाचित्र इंटरनेटवर सार्वजनिक करतात. वास्तविक कॅमेरा ट्रॅपमधील छायाचित्र केवळ कार्यालयीन उपयोगासाठी असतात. मात्र असे असताना काही अतिउत्साही कर्मचारी आणि अधिकारी ते फोटो सार्वजनिक करतात. यामुळे वन विभागाने आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करू न, कॅमेरा ट्रॅपमधील वाघाचे छायाचित्र सोशल मीडियावर टाकू नये, याविषयी सूचना करण्याची गरज आहे. एनटीसीएने आपल्या या पत्रातून यासंबंधी महत्त्वपूर्ण सूचनाही दिल्या आहेत.