शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

पाऱ्याला नाही पारावार!

By admin | Updated: March 29, 2017 02:48 IST

यासोबतच विदर्भात सर्वांधिक तापमानासाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपुरातील पारा हा ४३.२ अंशावर पोहोचला आहे.

मार्च एन्डिंगलाच ४२.६ वर : यावर्षीचे सर्वाधिक तापमान यासोबतच विदर्भात सर्वांधिक तापमानासाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपुरातील पारा हा ४३.२ अंशावर पोहोचला आहे. मागील गेल्या काही दिवसांपासून उपराजधानीत पारा सतत वर चढत आहे. त्याचवेळी उष्णतेची ही लाट पुढील काही दिवस अशीच कायम राहील असा अंदाज आहे. गेल्या तीन दिवसांत उपराजधानीतील पारा हा ४२ अंशाभोवती फिरतो आहे. मात्र मागील २४ तासात नागपुरातील तापमानात अचानक २.२ अंशाने वाढ झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक तापमान नोंदले जाण्याची शक्यता आहे. या वाढत्या तापमानाने जनजीवन प्रभावित झाले आहे. दुपारी अक्षरश: उन्हाचे चटके बसू लागले आहेत. यामुळे रस्ते ओस पडल्याचे चित्र दिसून येते. सायंकाळी उशिरापर्यंत उन्हाच्या झळा जाणवतात. उन्हापासून बचाव करण्यासाठी दुपट्टे, टोप्या तसेच गॉगल्सची मागणी वाढली असून, घराघरात एसी आणि कूलरचा आधार घेतला जात आहे. शीतपेयांच्या दुकानातही मोठी गर्दी वाढली आहे. त्याचवेळी या उष्णतेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनही सज्ज झाले असून, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी) सिमेंट रस्त्यांवर असह्य चटके हवामान तज्ज्ञांच्या मते, उपराजधानीत दरवर्षी मार्च महिन्यातील तापमान ३८ ते ४० अंशा दरम्यान असते. मात्र यंदा मार्च महिन्यातील तापमानाने ४२.९ चा टप्पा गाठला असून, हा आतापर्यंतच्या तापमानाचा सर्वोच्च उच्चांक आहे. शिवाय यापुढे तापमानात पुन्हा सतत वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षभरात शहरात सिमेंट रस्त्यांची मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. त्याचाही तापमानावर परिणाम होत असून, दुपारी या रस्त्यावर उन्हाची अधिकच तीव्रता जाणवते. उन्हामुळे तापलेल्या या सिमेंट रस्त्यावरून चालताना शरीराला अक्षरश: असह्य चटके बसतात.