शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘नो हॉर्न प्लीज’; नागपूर आरटीओची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 10:54 IST

गरज नसताना व नको तिथे कर्णकर्कश हॉर्न वाजवून हृदयाचे ठोके वाढविणाऱ्या वाहनचालकांना प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहर नागपूरने चौकाचौकातील वाहनांना ‘नो हॉर्न प्लीज’चे स्टिकर लावून ध्वनी प्रदूषणाबाबत जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.

ठळक मुद्देवाहनांना लावले स्टिकर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गरज नसताना व नको तिथे कर्णकर्कश हॉर्न वाजवून हृदयाचे ठोके वाढविणाऱ्या वाहनचालकांना प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहर नागपूरने चौकाचौकातील वाहनांना ‘नो हॉर्न प्लीज’चे स्टिकर लावून ध्वनी प्रदूषणाबाबत जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. सुरुवातीला जागृती व नंतर कठोर कारवाई, अशी ही मोहीम असणार आहे.शहरातील शांतता झोनसह अनेक चौक कर्णकर्कश ‘हॉर्न’च्या गोंगाटाने नेहमीच गजबजले असते. डोके भंडावून सोडणाऱ्या या ‘हॉर्न’चा वापर नियमाप्रमाणे होणे आवश्यक असताना चौकाचौकात व रस्त्यांवर या नियमाचे उल्लंघनच जास्त होत असल्याचे चित्र आहे. कर्णकर्कश ‘हॉर्न’मुळे लहान मुले व वृद्धांना धोका निर्माण झाला असून, हृदयाचे रुग्णही वाढले आहेत. याबाबत वाहनधारकांमध्ये जागृती करण्यासाठी वाहनाच्या पाठीमागे इंग्रजी शब्दात ‘हॉर्न नॉट ओके’ व मराठी शब्दात ‘हॉर्न नको’ अशाप्रकारचे स्टिकर्स लावण्याची मोहीम सुरू करण्यात आली. सोमवारी ‘नो हॉर्न डे’ उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. आरटीओ शहर कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक, अधिकारी-कर्मचारी याच्या जनजागृतीसाठी रस्त्यावर उतरले. सकाळपासून चौकाचौकातील सिग्नलवर थांबलेल्या वाहनांवर स्टिकर लावण्यात आले.‘लोकमत’शी बोलताना प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार म्हणाले, गरज नसतानाही ‘हॉर्न’ वाजविण्याच्या घाणेरड्या सवयीमुळे लोक जाणते-अजाणतेपणी इतरांना त्रास देतात. हॉर्नच्या कर्णकर्कश आवाजामुळे अनेक शारीरिक व्याधी जडतात. रक्तदाब वाढणे, कमी ऐकू येणे, मानसिक संतुलन ढळणे यासारख्या शारीरिक तक्रारींना सामोरे जावे लागते. अनावश्यक ठिकाणी हॉर्न वाजविण्याची वाहनधारकांची सवय सुटावी, यासाठी ही मोहीम राबविली जात आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस