शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात विमानतळावर ‘कोरोना’ची तपासणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 20:33 IST

नागपुरात दोहा आणि शारजा येथून आंतरराष्ट्रीय विमाने येत असतानादेखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांच्या ‘थर्मल’ तपासणीची कुठलीही व्यवस्था नसल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात ‘कोरोना’ विषाणूचा शिरकाव झाला असताना विमानतळांवर येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागपुरात दोहा आणि शारजा येथून आंतरराष्ट्रीय विमाने येत असतानादेखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांच्या ‘थर्मल’ तपासणीची कुठलीही व्यवस्था नसल्याचे चित्र आहे.‘कोरोना’च्या भीतीमुळे विदेशी नागरिकांची येण्याची संख्या घटलेली नाही व विमानसेवेवरदेखील कुठलाही फरक पडलेला नाही. नागपूर विमानतळावर येणाºया विमानांच्या संख्येतदेखील कुठलीही घट झालेली नाही, अशी माहिती विमानतळावरील सूत्रांनी दिली आहे.दरम्यान, ‘कोरोना’ विषाणूच्या भीतीमुळे जगातील पर्यटनाला फटका बसत असताना नागपुरात मात्र मोठा फटका बसलेला नाही. विदर्भात मोठ्या प्रमाणावर वन्य पर्यटनासाठी विदेशी पर्यटक येतात. पेंच (खुरसापार), पेंच (मध्यप्रदेश) तसेच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनावरही फारसा परिणाम नसल्याचे सांगितले जात आहे. तसेही येथे येणाऱ्यांमध्ये इंग्लंडसह युकेमधील पर्यटकांची संख्या अधिक असते. तुलनेत चीन आणि जपानचे पर्यटक फारच नगण्य असतात. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये २५ ते ३० रिसॉर्ट्स आहेत. यातील काही रिसॉर्ट्समधील विदेशी पर्यटकांच्या बुकिंग मात्र रद्द झाल्या आहेत. मोहर्ली गेटवरील एका रिसोर्टमधील दोन बुकिंग रद्द झाल्याची माहिती आहे.वैद्यकीय सेवा सज्जदुसरीकडे शहरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ‘कोरोना’च्या संशयित रुग्णांच्या नमुने तपासणीचे केंद्र उघडण्यात आले आहे. नागपूरमध्ये आतापर्यंत तीन संशयित रुग्ण आढळून आले. परंतु त्यांचे नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले. सध्या मेडिकलमध्ये एक वॉर्ड कोरोना व्हायरसच्या संशयित रुग्णांसाठी सज्ज ठेवण्यात आला आहे.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना