शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

भंडारातील मनरो शाळेच्या मैदानावर बांधकाम करण्यास मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:09 IST

नागपूर : भंडारा येथील ब्रिटिशकालीन लाल बहादूर शास्त्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या (मनरो शाळा) मैदानावर व्यापारी संकुलासह इतर ...

नागपूर : भंडारा येथील ब्रिटिशकालीन लाल बहादूर शास्त्री माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या (मनरो शाळा) मैदानावर व्यापारी संकुलासह इतर विविध प्रकारचे वादग्रस्त बांधकाम करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी अंतरिम मनाई केली, तसेच राज्य सरकार, भंडारा जिल्हा परिषद व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून, यावर चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. वादग्रस्त बांधकामांविरुद्ध डॉ.नितीन तुरसकर यांच्यासह दहा माजी विद्यार्थ्यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. ही शाळा १८८१ मध्ये बांधण्यात आली आहे. शाळेची इमारत हेरिटेज आहे. असे असताना जिल्हा परिषदेने शाळेच्या मैदानावर ६८ गाळ्यांचे व्यापारी संकुल, बचत भवन, सभागृह, अध्यक्ष व उपाध्यक्षांकरिता निवासस्थान इत्यादी बांधकामे करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थायी समिती व आमसभेमध्ये या संदर्भातील प्रस्ताव वेळेवर सादर करून, तो मंजूर करून घेण्यात आला. या प्रकल्पाकरिता ९ जानेवारी, २०२१ रोजी निविदा नोटीस प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर, २९ जानेवारी रोजी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आली. या प्रकल्पाला नगर रचना विभागाने मान्यता दिलेली नाही. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास शाळेची ऐतिहासिक ओळख नष्ट होईल. याकरिता वादग्रस्त प्रकल्प अवैध ठरवून रद्द करण्यात यावा, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने वरिष्ठ ॲड.सुबोध धर्माधिकारी व ॲड.भानुदास कुलकर्णी यांनी बाजू मांडली.