शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचे आर्थिक स्रोत मर्यादित : अर्थसंकल्पाने फोडला घाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 00:05 IST

अर्थसंकल्पात अपेक्षित उत्पन्न व प्रत्यक्ष उत्पन्न यात मोठी तफावत आहे. सरकारी अनुदानावर महापालिकेचा गाडा सुरू आहे. त्यातच तीन महिन्यांनी विधानसभा निवडणुका होत आहे. याचा विचार करता लोकांना खूश करण्यासाठी घोषणा होणार आहे. परंतु आर्थिक स्रोत शोधण्यात अपशय आल्याने, वर्ष २०१९-२० या वर्षाचा अर्थसंकल्प तयार करताना स्थायी समितीला घाम फुटला आहे.

ठळक मुद्देस्थायी समितीचा अर्थसंकल्प जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अर्थसंकल्पात अपेक्षित उत्पन्न व प्रत्यक्ष उत्पन्न यात मोठी तफावत आहे. सरकारी अनुदानावर महापालिकेचा गाडा सुरू आहे. त्यातच तीन महिन्यांनी विधानसभा निवडणुका होत आहे. याचा विचार करता लोकांना खूश करण्यासाठी घोषणा होणार आहे. परंतु आर्थिक स्रोत शोधण्यात अपशय आल्याने, वर्ष २०१९-२० या वर्षाचा अर्थसंकल्प तयार करताना स्थायी समितीला घाम फुटला आहे.मागील स्थायी समितीने २९४६ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. मात्र गेल्या आर्थिक वर्षात २०१७.७५ कोटींचाच महसूल तिजोरीत जमा झाला. स्थायी समितीच्या उद्दिष्टाच्या तुलनेत दोनतृतीयांश वाटा प्रशासनाला उचलता आला. याचा विचार करता पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पसाठी समितीला चांगलीच कसरत करावी लागत आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, विद्यमान स्थायी समिती गेल्या वर्षाच्या अर्थसंकल्पातील रकमेतून २०० कोटींची तरतूद करण्याच्या विचारात आहे. दर महिन्याला ९३ कोटी जीएसटी अनुदान मिळत आहे. मालमत्ता कराचे लक्ष्य ५०० कोटींच्या आसपास राहील. अन्य विभागाचे उत्पन्न फुगविण्याचा प्रकार होईल. असे असले तरी वित्त वर्षाच्या अखेरीस महापालिकेच्या तिजोरीत २५०० कोटींचाच महसूल जमा होण्याचा अंदाज आहे.प्राप्त महसुलाचा अभ्यास करता यात शासकीय अनुदानाचा वाटा ७५ टक्के आहे. उर्वरित निधी महापालिकेच्या आर्थिक स्रोतातून जमा होतो. गेल्या वर्षात जमा झालेल्या २०१७.७५ कोटीत १५४४.२२ कोटी विविध स्वरूपाच्या अनुदातून मिळाले आहे. यात ८६९.०७ कोटी जीएसटी अनुदानाचे आहे.मालमत्ता व पाणीपट्टीसोबतच नगर रचना विभाग आदी महापालिकेचे मुख्य आर्थिक स्रोत आहेत. परंतु या विभागाकडून अपेक्षित महसूल जमा होताना दिसत नाही. कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे महापालिकेची तिजोरी खाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात परिवहन समितीच्या अर्थसंकल्पाचा समावेश असतो. परिवहन समितीने आपला अर्थसंकल्प आधीच तयार केला आहे. मात्र स्थायी समितीला तो स्वीकारण्यासाठी वेळ नाही. यामुळे अर्थसंकल्प सादर करण्याला विलंब होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBudgetअर्थसंकल्प