लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या जुन्या भंगार बसचा पुनर्वापर करून महिलांसाठी खास ‘ती बस’ टॉयलेटचे निर्माण करणार असल्याची माहिती महापौर संदीप जोशी यांनी दिली. या योजनेसंदर्भात महापौरांनी बुधवारी मनपातील महापौर कक्षात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, परिवहन विभागाचे यांत्रिकी अभियंता योगेश लुंगे, साराप्लास्ट इंटरप्राईजेसचे शेखर कांत, संदीप जाट आदी उपस्थित होते.मनपाने सुलभ शौचलायांची सुविधा उपलब्ध केली आहे. पंरतु वर्दळीची ठिकाणे व आठवडी बाजारात महिलांसाठी शौचालयाची सुविधा नाही. याचा विचार करता परिवहन विभागाच्या जुन्या भंगार पडलेल्या बसचा पुनर्वापर करून महिलांसाठी टॉयलेट बस निर्माण करा, या बसला ‘ती बस’ असे नाव देण्याचे निर्देश महापौरांनी दिले.सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर दोन बसचा यासाठी वापर केला जाणार आहे. एक बस ही फिरती राहील. ती शहरातील वर्दळीच्या ठिकाणे व आठवडी बाजार, मार्केट परिसरात राहील. तर एक बस ही राहटे कॉलनी चौकात स्थिर राहणार आहे. लवकरच अशा ५० बसेस मनपा निर्माण करणार आहे. या बसेसमध्ये महिलांसाठी स्वच्छतागृह राहणार असून उरलेल्या जागेत उपहारगृह ठेवण्यात येणार आहे. यामध्ये महिलांसाठी चहा, फराळाची सुविधा राहील, अशी माहिती शेखर कांत यांनी दिली. अशा प्रकारच्या बसेसमुळे महिलांसाठी शौचालयाचा प्रश्न सुटेल, असा विश्वास महापौरांनी यावेळी व्यक्त केला.
नागपुरात महिलांसाठी मनपाचे 'ती बस' टॉयलेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 00:22 IST
महापालिकेच्या जुन्या भंगार बसचा पुनर्वापर करून महिलांसाठी खास ‘ती बस’ टॉयलेटचे निर्माण करणार असल्याची माहिती महापौर संदीप जोशी यांनी दिली.
नागपुरात महिलांसाठी मनपाचे 'ती बस' टॉयलेट
ठळक मुद्देदोन टॉयलेट प्रायोगिक तत्त्वावर सुरू करणार