शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मनपा कर्मचाऱ्याने इमारतीवरून घेतली उडी

By admin | Updated: November 30, 2014 00:55 IST

महानगरपालिकेच्या सिव्हिल लाईन्स मुख्यालय स्थित नवनिर्मित प्रशासकीय इमारतीच्या छतावरून मनपाच्या एका लिपिकाने उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी १०.३० वाजता घडली.

मनपा मुख्यालयातील घटना : घटनास्थळीच मृत्यू नागपूर : महानगरपालिकेच्या सिव्हिल लाईन्स मुख्यालय स्थित नवनिर्मित प्रशासकीय इमारतीच्या छतावरून मनपाच्या एका लिपिकाने उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी १०.३० वाजता घडली. पुंडलिक सुपारे (५०) रा. सावरबांधे ले-आऊट हुडकेश्वर असे मृताचे नाव आहे. मनपातील सूत्रानुसार मृत मागील १९ वर्षांपासून मनपा मुख्यालयाच्या जुन्या इमारतीतील पहिल्या माळ्यावरील लेखा विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर सहा वर्षांपूर्वी त्यांना बढती मिळाली. सध्या ते धरमपेठ बोले पेट्रोल पंपाजवळील जलप्रदाय विभागात उच्च श्रेणी लिपिक म्हणून कार्यरत होते. नेहमीप्रमाणे ते सकाळी १० वाजता धरमपेठ येथील कार्यालयात पोहोचले. हजेरी लावल्यानंतर सिव्हिल लाईन्स मुख्यालयात काही काम असल्याचे सांगून ते कार्यालयाबाहेर पडले. येथील त्यांच्या जुन्या कार्यालयामागे नवीन प्रशासकीय इमारत आहे. या नवनिर्मिती प्रशासकीय इमारतीच्या गच्चीवर ते पोहोचले. त्यांना जाताना अनेकांनी पाहिले. सकाळची वेळ होती. नुकतेच कार्यालय सुरू झाले असल्याने अनेकजण उपस्थित होते. सुपारे यांनी अग्निशमन विभागाच्या बाजूने वरून उडी घेतली. खाली पडताच ते रक्तबंबाळ झाले आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. सुपारे खाली पडताच उपस्थित लोक त्यांच्या दिशेने धावले. अधिकारीसुद्धा घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी मेयोला पाठविला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहे. पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.मृत सुपारे हे धार्मिक स्वभावाचे होते. ते हनुमानाचे भक्त होते. ते शनिवारी उपवास ठेवायचे. नेहमीप्रमाणे वस्तीतील हनुमान मंदिरात पूजा केल्यानंतर त्यांनी थोडा फराळ केला. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता ते आॅफिससाठी रवाना झाले. ते सर्वांशी हसतमुखाने वागायचे. १४ डिसेंबर रोजी त्यांच्या बहिणीच्या मुलीचे लग्न आहे. लग्नाच्या तयारीसंबंधात घरी चर्चा सुरू होती. (प्रतिनिधी)विधानभवनासमोरील इमारतीवर चढण्याचा प्रयत्न सुपारे यांच्या आत्महत्येप्रकरणी मनपा कार्यालयात सुरू असलेल्या चर्चेनुसार सुपारे यांना जलप्रदाय विभागातून मुख्यालयात बदली हवी होती. त्यावरून ते तणावात होते. तर काही जण म्हणतात की ते मागील काही दिवसांपासून तणावात असल्याचे दिसून येत होते. मनपा प्रशासकीय इमारतीत येण्यापूर्वी त्यांनी विधानभवनासमोरील बहुमजली इमारतीवर चढण्याचाही प्रयत्न केला होता. परंतु सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले. त्यामुळे ते मनपा परिसरात आले. कुटुंबीय मानसिक धक्क्यात मृत सुपारे यांच्या कुटुंबात पत्नी वनिता आणि दोन मुले आहेत. त्यांची मोठी मुलगी नेहा (२०) पॉलिटेक्निकच्या तृतीय वर्षाची विद्यार्थिनी आहे. तर मुलगा शुभम (१८) बारावीत आहे. पुंडलिक यांनी या पद्धतीने केलेल्या आत्महत्येमुळे कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसला आहे.