शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मनपाचा निर्णय : ट्रॅफिक सिग्नल्सच्या देखभालीची जबाबदारी एकाच फर्मकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 23:45 IST

संपूर्ण शहरातील ट्रॅफिक सिग्नल्सचे कार्यान्वयन व देखभालीचे कंत्राट मे. डेकोफर्ण कन्स्ट्रक्शन या एकाच भागीदारी फर्मला देण्याचा निर्णय महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला आहे. ही माहिती सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात आली.

ठळक मुद्देहायकोर्टातील याचिका निकाली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संपूर्ण शहरातील ट्रॅफिक सिग्नल्सचे कार्यान्वयन व देखभालीचे कंत्राट मे. डेकोफर्ण कन्स्ट्रक्शन या एकाच भागीदारी फर्मला देण्याचा निर्णय महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला आहे. ही माहिती सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात आली.मनपाने ७० लाख ५३ हजार ८८० रुपयाच्या या कंत्राटाची सप्टेंबर-२०१६ मध्ये नोटीस जारी केली होती. मे. डेकोफर्ण कन्स्ट्रक्शनने मूळ दरापेक्षा १५.३ टक्के कमी दराने हे काम करण्याची तयारी दर्शविली. त्यांच्यासोबत आणखी दोघेजण समान रकमेत काम करण्यास तयार झाले. परिणामी, मनपाने सर्वांच्या सुविधेकरिता शहराची तीन भागात विभागणी करून तिघांनाही कंत्राट देण्याचा निर्णय घेतला. त्यासंदर्भात ६ ऑक्टोबर २०१७ रोजी प्रस्ताव जारी करण्यात आला. त्याविरुद्ध मे. डेकोफर्ण कन्स्ट्रक्शनने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका तेव्हापासून प्रलंबित होती. दरम्यान, अन्य दोन कंत्राटदारांनी आता २०१६ मधील दराने काम करण्यास नकार देऊन माघार घेतली. त्यामुळे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी मनपाला या कंत्राटावर सुधारित निर्णय घेण्यास सांगितले होते. त्यानुसार, मनपाने मे. डेकोफर्ण कन्स्ट्रक्शनलाच संपूर्ण शहरातील ट्रॅफिक सिग्नल्सचे कार्यान्वयन व देखभालीचे कंत्राट देण्याचा निर्णय घेतला. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता सदर याचिका निकाली काढली. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. सुबोध धर्माधिकारी तर, मनपातर्फे अ‍ॅड. जेमिनी कासट यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयTrafficवाहतूक कोंडीNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका