शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

नितीन गडकरी यांच्या सत्काराची जय्यत तयारी

By admin | Updated: May 23, 2017 01:46 IST

भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

कस्तूरचंद पार्कवर षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा : अमित शहा, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, श्री श्री रविशंकर येणार लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यानिमित्त नागपूरसह राज्यभरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. कस्तूरचंद पार्कवर त्यांचा भव्य सत्कार होणार असून या सत्काराची जय्यत तयारी सुरू आहे. हा सोहळा सर्वपक्षीय असून देशातील विविध क्षेत्रातील नामवंत यात सहभागी होणार आहेत. नितीन गडकरी हे २७ मे रोजी ६१ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. यानिमित्त कस्तूरचंद पार्क येथे सायंकाळी ६ वाजता त्यांचा षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, आध्यात्मिक संत श्री श्री रविशंकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याशिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे,गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह, झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास, उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह केंद्रीय मंत्री, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, भाजपाचे राष्ट्रीय पातळीवरील पदाधिकारी, सिने कलावंत आदी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. गडकरी यांचा वाढदिवस संपूर्ण राज्यात साजरा केला जाणार असून त्यानिमित्त जिल्ह्या-जिल्ह्यात विविध कार्यक्रम व सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या सोहळ्याच्या आयोजनासाठी स्थापन करण्यात आलेल्या श्री. नितीन गडकरी षष्ट्यब्दीपूर्ती गौरव समारोह समितीचे कार्याध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. संयोजक ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व सहसंयोजक वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी हे आहेत. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे....अन् मुख्यमंत्री झाले आयोजक सुरुवातीला नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार स्थानिक स्तरावर करण्याचा निर्णय नागपुरातील नेत्यांनी घेतला होता. या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावण्यात येणार होते. त्यासाठी नागपुरातील नेते मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले. तेव्हा मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले ‘नितीन गडकरी हे आपल्या सर्वांचे नेते आहेत. त्यामुळे त्यांचा वाढदिवस हा स्थानिक स्तरावर न होता तो भव्यदिव्य असाच झाला पाहिजे’ त्या कार्यक्रमाला मी प्रमुख अतिथी म्हणून नव्हे तर आयोजकाच्या भूमिकेत राहील, असेही त्यांनी सांगितले. त्यातून या भव्य कार्यक्रमाची रूपरेषा ठरली. श्री. नितीन गडकरी षष्ट्यब्दीपूर्ती गौरव समारोह समिती स्थापन झाली.६१ लाख रुपयाची थैली देणार कस्तूरचंद पार्कवर होणाऱ्या षष्ट्यब्दीपूर्तीच्या सोहळ्यात नितीन गडकरी यांचा शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे. यानिमित्त भाजपाचे आमदार व नेतेमंडळींतर्फे गडकरी यंना ६१ लाख रुपयांची थैली भेटस्वरुपात प्रदान करण्यात येणार आहे. गडकरी हा निधी विविध सामाजिक संघटनांना देणगी म्हणून देणार आहेत.