शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

‘एनआयटी’ भरतीमध्ये आघाडीवर

By admin | Updated: July 21, 2016 02:00 IST

एनआयटी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशनमध्ये विद्यार्थ्यांना सर्वंकष मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देऊन कॅम्पस मुलाखतीसाठी

एकूण ८१८ विद्यार्थ्यांची निवड : नामांकित कंपन्यांची कॉलेजला भेट नागपूर : एनआयटी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशनमध्ये विद्यार्थ्यांना सर्वंकष मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देऊन कॅम्पस मुलाखतीसाठी तयार करण्यात येते. २०१५-१६ च्या सत्रात इंजिनीअरिंग आणि पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना नोकरी प्रदान करण्यासाठी नामांकित कंपन्यांनी एनआयटीला भेट देऊन मुलाखती घेतल्या. कॉलेजच्या विविध मोहिमेत एकूण १५ हजार ९२६ विद्यार्थ्यांनी भाग घेतला असून, त्यापैकी ८१८ विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली आहे. गेल्या सत्रात ७३ कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली. त्यात एनआयटीच्या १७१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यात कॉलेजच्या ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट विभागाचे डीन प्रा. अनिल तिजारे यांची मोलाची भूमिका आहे. भरतीसाठी एनआयटीच्या ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख डॉ. राजेश चौकसे आणि पॉलिटेक्निक टीपीओ विभागप्रमुख प्रा. प्रशांत रहाटे यांच्यासह सर्व विभागप्रमुख आणि समन्वयक चमू कार्यरत आहे. विंड वर्ल्ड इंडिया लि., महिन्द्र अ‍ॅण्ड महिन्द्र, ताल मॅन्युफॅक्चरिंग लि., व्हिडिओकॉन, वेरॉक इंजिनीअरिंग, सिएट टायर, व्होल्टाज लि., धूत ट्रान्समिशन, प्रॉडक्शन मॉडेलिंग इंडिया, बजाज इलेक्ट्रिकल्स, भारत फोर्ज, एनझिग्मा, यालामचिली, विप्रो, वेबडायरेक्ट, टुपिड टेक्नॉलॉजिस, क्वॉलिटी किओसक, एजीएस ट्रान्सअ‍ॅक्ट, टीसीएस इयॉन, फिक्शन टू फॅक्ट, कॉमसॉफ्ट टेक्नॉलॉजिस, क्यूईडी एम्बेडेड सर्व्हिसेस, फ्लार्इंग पेग्वीन, रिएचो, सुदेशी, इन्पायर, रोथे इडर, सुनील हायटेक, शारदा इस्पात, एचयूएफ इंडिया लि., अ‍ॅसेंट बिझनेस सोल्युशन, ग्रेस एड्युनेट, आय-सर्व्हे कम्युनिकेशन आदींसह अनेक कंपन्यांनी कॉलेजला भेटी दिल्या आहेत. इन्स्टिट्यूशन आणि इंडस्ट्रीमधील अंतर दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. यासाठी वैयक्तिक मुलाखत, समूह चर्चा, वेळेचे व्यवस्थापन, संवाद कौशल्य आदींसह विविध विषयांवर भर दिला जातो. विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक भेटीचे आयोजन आणि जीआरई, जीमॅट, कॅट, गेट, टोफेल आदी स्पर्धा परीक्षांसाठी प्रोत्साहन देण्यात येते. एनआयटीचे विद्यार्थी अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, आॅस्ट्रेलिया तसेच आयआयटी खरगपूर, आयआयटी पवई आणि आयआयएम शिलाँग येथे एमएस व एमबीएचे शिक्षण घेत आहेत. पवन सहारेला गेट-२०१६ मध्ये अ.भा.स्तरावर ७२९ वे स्थान मिळाले आहे. एनआयटीचे प्र्राचार्य डॉ. सुरेंद्र गोळे, एनआयटी पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. जी.एफ. पोटभरे आणि व्यवस्थापनाने चमू आणि निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. (वा.प्र.)