शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

नऊ वर्षाच्या सियाने बनविले रॉकेट शिकविणारे अ‍ॅप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 22:35 IST

अवघ्या नऊ वर्षाच्या सिया नराळे या चिमुकलीने चांद्रयान-२ मोहिमेची प्रेरणा घेत रॉकेट लॉन्चिंगचे तंत्र शिकविणारे ‘रॉकेट सिमुलेशन अ‍ॅप’ विकसित केले आहे.

ठळक मुद्देइस्रोच्या चांद्रयान-२ मोहिमेतून घेतली प्रेरणा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नुकतेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) द्वारे चांद्रयान-२ ही मोहीम राबविली होती. ती शेवटच्या टप्प्यात अयशस्वी ठरली असली तरी नागरिक व विशेषत: विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण करण्यात मोठे यश प्राप्त केले. याची प्रेरणादायी स्टोरी उपराजधानीतून आली आहे. येथे अवघ्या नऊ वर्षाच्या सिया नराळे या चिमुकलीने चांद्रयान-२ मोहिमेची प्रेरणा घेत रॉकेट लॉन्चिंगचे तंत्र शिकविणारे ‘रॉकेट सिमुलेशन अ‍ॅप’ विकसित केले आहे.टीपटॉप कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी असलेल्या सियाने विकसित केलेले हे अ‍ॅप मुलांसाठी अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आहे. चांद्रयान-२ मोहिमेचे दूरदर्शनवरून प्रक्षेपण झाले. इस्रोच्या शास्त्रज्ञांची टीम, त्यातील महिला शास्त्रज्ञांनी बजावलेली कामगिरी या सगळ्या गोष्टी सियासाठी भारावणाऱ्या ठरल्या. याबाबत इंटरनेटवरून अभ्यास करीत स्वत:च रॉकेट सिमुलेशन अ‍ॅप विकसित केले. या अ‍ॅपद्वारे स्पेस स्टेशनवरून रॉकेटचे लॉन्चिंग कसे होते, अंतराळात लँडर, रोव्हरचे भ्रमण आणि चंद्रावर किंवा इतर ग्रहावर लँड कसे होते हे सर्व मुलांना क्रमाक्रमाने समजाविण्यात येते. हा एक प्रकारचा खेळ आहे, ज्यामध्ये मुले स्वत: सहभागी होऊन रॉकेट उडविण्याचे प्रात्यक्षिक करू शकतील. यात मनोरंजक गोष्ट म्हणजे सियाने कोडिंग तंत्राचा उपयोगही यात केला आहे. त्यासाठी ती व्हाईट हॅट ज्युनियर लर्निंग प्रोग्राममधून कोडिंगचे तंत्र शिकली व अ‍ॅपमध्ये त्याचा उपयोग केला. या अ‍ॅपमध्ये मुले एखाद्या मोबाईल गेमप्रमाणे रॉकेटच्या प्रत्येक सुट्या भागाचा अभ्यास करू शकतील आणि क्रमाक्रमाने हे सर्व पार्ट्स जोडून रॉकेट तयार करू शकतील. सियाच्या या कौशल्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. इस्रोची चांद्रयान मोहीम असफल ठरली तरी देशातील कोट्यवधी मुलांमध्ये अंतराळ संशोधनाबाबत लाख मोलाची प्रेरणा निर्माण केली, हेच यातून सिद्ध होते.

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2