शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपात साडेचार हजार पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 10:49 IST

स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीत अपर आयुक्त, उपायुक्त, वित्त व लेखा अधिकारी अशी महत्त्वाची सात पदे रिक्त आहेत. कर्मचाऱ्यांचीही साडेचार हजार पदे रिक्त आहेत.

ठळक मुद्देअतिरिक्त प्रभारावर गाडा पूर्णवेळ अपर आयुक्त, उपायुक्त नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीत विकास कामांचा धडाका सुरू आहे. यात महापालिकेची भूमिका महत्त्वाची आहे. परंतु अपर आयुक्त, उपायुक्त, वित्त व लेखा अधिकारी अशी महत्त्वाची सात पदे रिक्त आहेत. कर्मचाऱ्यांचीही साडेचार हजार पदे रिक्त आहेत. अधिकाऱ्यांवर कामाचा बोजा वाढला असून अतिरिक्त प्रभारावर महापालिकेचा गाडा चालत आहे. याचा विकास कामावर परीणाम झाला आहे. या परिस्थितीत शहराचा विकास कसा होईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.वर्षभरापूर्वी डॉ. रामनाथ सोनवणे अपर आयुक्तपदावरून निवृत्त झाले. काही दिवसांपूर्वी डॉ. आर. झेड. सिद्दीकी सेवानिवृत्त झाल्याने अपर आयुक्त रवींद्र कुंभारे यांना अतिरिक्त प्रभाराची जबाबदारी सांभाळावी लागत आहे. मुुख्य लेखा वित्त अधिकारी मदन गाडगे काही महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले. अद्याप हे पद न भरल्याने या पदाचा अतिरिक्त प्रभार लेखापरीक्षक मोना ठाकू र यांच्याक डे सोपविण्यात आला आहे. मुख्यअभियंता यांचेही पद रिक्त आहे. अतिरिक्त प्रभारावर या विभागाचा कारभार सुरू आहे. महापालिकेत उपायुक्तांची सात पदे मंजूर आहेत. यातील तीन कार्यरत असून चार पदे रिक्त असल्याने उपायुक्तांसह सहायक आयुक्तांना अतिरिक्त प्रभार सांभाळावे लागत आहे.

३५ टक्के पदे रिक्तकाही दशकापूर्वीच्या आस्थापनेनुसार नागपूर महापालिकेत कर्मचाऱ्यांची १२,६२५ पदे मंजूर आहेत. परंतु दर महिन्याला २५ ते ३० कर्मचारी व अधिकारी सेवानिवृत्त होतात. सध्या ८,२८१ कर्मचारी कार्यरत असून, ४,३४४ पदे रिक्त आहेत. टक्केवारीचा विचार करता जवळपास ३५ टक्के पदे रिक्त आहेत. शहराचा गेल्या काही वर्षात विस्तार झाला आहे. त्यातच मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्याने शहरातील विकास कामावर याचा परिणाम होत आहे.

कर्मचाऱ्यांवरही बोजा वाढलानवीन आकृतिबंधात कर्मचाऱ्यांची १७ हजार पदे निर्माण करण्यात आलेली आहेत. परंतु महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने भरती प्रक्रिया बंद आहे. २०१५-१६ या वर्षात काही उपअभियंता व अभियंता पदांची भरती केली. परंतु मागील अनेक वर्षांत महापालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आलेली नाही महापालिकेच्या काही विभागात कंत्राट पद्धतीवर अस्थायी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. असे असले तरी रिक्त पदामुळे सर्वच कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त बोजा वाढला आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका