शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या आमदार निवासात अलगीकरण कक्षात नऊ महिन्याची गर्भवती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 20:34 IST

आमदार निवासाच्या अलगीकरण कक्षात शनिवारी पुन्हा चार संशयित पॉझिटिव्ह आले आहेत. याच अलगीकरणाच्या इमारतीत नऊ महिन्याच्या गर्भवतीसह तिच्या दोन वर्षाच्या मुलीला ठेवण्यात आले. कक्षात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने तिच्या कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण आहे.

ठळक मुद्देकक्षातील संशयित पॉझिटिव्ह आल्याने भीतीचे वातावरण

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आमदार निवासाच्या अलगीकरण कक्षात शनिवारी पुन्हा चार संशयित पॉझिटिव्ह आले आहेत. याच अलगीकरणाच्या इमारतीत नऊ महिन्याच्या गर्भवतीसह तिच्या दोन वर्षाच्या मुलीला ठेवण्यात आले. कक्षात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने तिच्या कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण आहे.दिल्लीहून आलेल्यांसोबतच मोमीनपुरा किंवा सतरंजीपुऱ्यातील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना आमदार निवासासह वनामती, रविभवन, लोणारा व सिम्बॉयसिस येथील अलगीकरण कक्षात महापालिका आणून ठेवत आहे. १६ एप्रिल रोजी सतरंजीपुऱ्यातील कोरोनाबाधित मृताच्या घराशेजारील एकाच कुटुंबातील सहा तर दुसऱ्या घरातील एका युवकाला मनपाने आमदार निवासात आणून क्वारंटाईन केले. यात नऊ महिन्याची गर्भवती व तिची दोन वर्षाची मुलगीही होती. त्या गर्भवतीने ‘लोकमत’ला फोन करून सांगितले की, त्याच दिवशी डागा रुग्णालयात तपासणीचा दिवस होता. याची माहिती मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांना दिली. परंतु त्यांनी ऐकून न घेता थेट आमदार निवासात आणून क्वारंटाईन केले. पतीला दुसऱ्या खोलीत तर मला, मुलीला व नणंदेला दुसऱ्या खोलीत ठेवले. इमारत क्र. दोन चौथ्या माळ्यावरील खोली क्र. ४३३ मध्ये ग्लोव्हज बेडवर इतरही पडले होते. खोलीची साफसफाई झाली नव्हती. याची माहिती येथील एका कर्मचाऱ्याला दिली, परंतु त्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे आम्हीच सफाई केली.नववा महिना असल्याने अवघडल्यासारखे होत आहे. यातच आमदार निवासातून कुणीना कुणी पॉझिटिव्ह येत असल्याने भीतीचे वातावरण आहे. येथे सर्वांना क्वारंटाईन केले असले तरी पाण्यापासून ते चहा व जेवणासाठी खोलीबाहेर व्हरांड्यात यावेच लागते. अशावेळी लागण होण्याची शक्यता असते. ज्या दिवशी आमदार निवासात आणले त्याच दिवशी नमुने घेऊन गेले, परंतु अहवाल मिळाला नाही. गर्भवती महिला व त्यांच्या कुटुंबासाठी वेगळी व्यवस्था असायला हवी, असेही तिचे म्हणणे होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMLA Hostelआमदार निवास