शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

राहुल आग्रेकरच्या दोन मारेकऱ्यांना नऊ दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 19:48 IST

आॅनलाईन लोकमतनागपूर : लॉटरीचे व्यवसायी राहुल सुरेश आग्रेकर यांची एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून जिवंत जाळून हत्या करणाºया दोन आरोपींना गुरुवारी लकडगंज पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्तात बुरख्यांमध्ये प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एम. टी. खरडे यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या दोन्ही आरोपींना ८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.पंकज सुरेश ...

ठळक मुद्देपंकजला हावडा तर जॅकीला नरसिंगपुरात अटकबुरख्यात हजर केले प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्याच्या न्यायालयात

आॅनलाईन लोकमतनागपूर : लॉटरीचे व्यवसायी राहुल सुरेश आग्रेकर यांची एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून जिवंत जाळून हत्या करणाºया दोन आरोपींना गुरुवारी लकडगंज पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्तात बुरख्यांमध्ये प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एम. टी. खरडे यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या दोन्ही आरोपींना ८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.पंकज सुरेश हरोडे (३०) रा. आनंदनगर, यशोदरा आणि जॅकी मणिलाल प्रजापती (३२) रा. नरसिंगपूर मध्यप्रदेश, अशी आरोपींची नावे आहे.पंकजला कोलकातानजीकच्या हावडा तर जॅकीला नरसिंगपूर येथे अटक करण्यात आली. दुर्गेश दशरथ बोकडे (३२) रा. राणी दुर्गावतीनगर हा फरार आहे. जॅकीचा प्रत्यक्ष खुनात सहभाग नाही. तो पंकजचा नातेवाईक आहे. पंकज आणि दुर्गेश यांनी अपहरण व खुनाचा गुन्हा केल्यानंतर ते सरळ जॅकीच्या नरसिंगपूर येथील गावी गेले होते. त्यांनी त्याला संपूर्ण घटना सांगितली होती. परंतु जॅकीने ही बाब पोलिसांना सांगितली नव्हती. त्यामुळे त्याला या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले.२१ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास आरोपींनी राहुलचे त्याच्या दारोडकर चौक येथील घरासमोरून अपहरण केले होते. त्याला आरोपींनी बोलेरोमधून नेले होते. आरोपींनी राहुलचा भाऊ जयेश यांच्या मोबाईलवर तीन वेळा एक कोटीच्या खंडणीसाठी फोन केले होते. त्यानंतर त्याला बुटीबोरी भागातील पेटीचुहा येथे नेऊन जिवंत जाळून त्याचा निर्घृण खून केला होता.गुरुवारी तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.व्ही. खांडेकर यांनी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले. १३ डिसेंबरपर्यंत त्यांच्या पोलीस कोठडी रिमांडची मागणी केली. न्यायालयाने ८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला.

 

टॅग्स :Murderखून