शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
2
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
3
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
4
“माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत CM फडणवीस यांच्यात नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
5
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
6
Post Office मध्ये जमा करा १ लाख, मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स व्याज; चेक करा डिटेल्स
7
प्राजक्ता माळीसोबत फोटो हवा म्हणून त्याने लिफ्टच थांबवली, पुढे काय घडलं? Video व्हायरल
8
कसोटीत सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणारे टॉप ५ भारतीय गोलंदाज!
9
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
10
अदानी-महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स गडगडले! सेन्सेक्स-निफ्टी सपाट; मात्र 'या' शेअरने केली कमाल!
11
'गाढवाचं लग्न'मधील सावळ्या कुंभाराच्या खऱ्या गंगीला पाहिलंत का?, एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री
12
कोंढव्यातील ‘त्या’ तरुणीवर गुन्हा दाखल; खोटी माहिती, पुरावे तयार करून पोलिसांची केली दिशाभूल
13
₹१५ वरुन ₹४५५ वर ट्रेड करतोय 'हा' शेअर; जोरदार तेजी, आता मोठा Whiskey ब्रँड खरेदी करण्याची तयारी
14
IND vs ENG: शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे!
15
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
16
स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहताय? 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' कसं मिळवायचं, व्याजासह प्रक्रिया जाणून घ्या
17
Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...
18
ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
19
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
20
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...

रात्रशाळेत ‘लक्ष्मी’ची सोनपावलं!

By admin | Updated: June 7, 2016 07:42 IST

सातत्याचा आजार आणि पुढे संसाराच्या गाड्यात शिक्षण राहून गेले. लक्ष्मीला ते सातत्याने बोचत होते. वैदर्भीय महिला देशाची

२५ वर्षांनंतर ओलांडला दहावीचा उंबरठा आनंद डेकाटे ल्ल नागपूरसातत्याचा आजार आणि पुढे संसाराच्या गाड्यात शिक्षण राहून गेले. लक्ष्मीला ते सातत्याने बोचत होते. वैदर्भीय महिला देशाची राष्ट्रपती होऊ शकते, तर आपण दहावीही नाही, असा प्रश्न तिला सातत्याने पडत होता. तिने पण केला आणि दोन तपानंतर (२५ वर्षानंतर )लक्ष्मीने दहावीचा उंबरठा अखेर यशस्वीपणे ओलांडला. लक्ष्मी महेश बर्लेवार असे या माऊलीचे नाव ! त्या सिरसपेठ भागात राहतात. सिरसपेठ येथील नरेंद्र नाईट हायस्कूल रात्रशाळेत शिकून त्यांनी वयाच्या ३९ व्या वर्षी दहावीची परीक्षा ६१ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण होत एक आदर्श घालून दिला. त्यांना यासाठी त्यांच्या पतीने प्रोत्साहित केले, हे विशेष.लक्ष्मी एका खासगी दवाखान्यात परिचारिकेचे शिक्षण घेत आहेत. लक्ष्मी बर्लेवार यांचे माहेरचे नाव रश्मी रमेश सुरवाडे आहे. लक्ष्मी यांच्या माहेरच्या घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. घरी तीन बहिणी आणि एक भाऊ होता. आर्थिक परिस्थितीमुळे कुणीही फारसे शिकू शकले नाही. आठव्या वर्गात असताना लक्ष्मी या खूप आजारी राहू लागल्या. त्या आजारातच त्यांनी नववीची परीक्षा दिली, परंतु त्यांचा एक विषय राहिला. आजारपण वाढत गेले आणि त्यांनी पुढे शिक्षण सोडले. त्यानंतर त्यांचे महेश बर्लेवार यांच्याशी लग्न झाले. त्या संसारात रमल्या. लग्नाला १७ वर्षे झाली. यादरम्यान शिक्षण अर्धवट राहिल्याची सल त्यांना नेहमी बोचत होती. इतरांसाठी प्रेरणा नाईट स्कूलमध्ये सहसा नोकरी करणारी मंडळीच प्रवेश घेतात. त्यांच्यात शिकण्याची जिद्द असते. परंतु लक्ष्मी बर्लेवार यांनी २५ वर्षानंतर दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करून इतरांसाठी एक आदर्श घालून दिला आहे. आता महिलाही अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुढे येतील, असा विश्वास आहे. - राजेंद्र झाडेमुख्याध्यापक, नरेंद्र नाईट हायस्कूल, सिरसपेठ