शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
2
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
3
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
4
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
5
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
6
पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना
7
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
8
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर साधूने त्रिशूळाने केला हल्ला, एक पोलीस अधिकारी जखमी   
9
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना
10
एक-एक करत 3 गाड्या उडवल्या; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला, 32 जवानांचा मृत्यू
11
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
12
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!
13
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
14
अरे व्वा! “निकाल पाहताच मी आणि माझे वडील खूप रडलो”; पिकअप ड्रायव्हरची लेक झाली SDM
15
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
16
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
17
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना
18
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
19
तुमच्या घरातील सोनं झालं अजून महाग! एकाच दिवसात मोठी वाढ, आजचे दर ऐकून बसेल धक्का!
20
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

विमानतळावर नायजेरियन तरुणाला पकडले

By admin | Updated: September 27, 2016 03:32 IST

वर्षभरापासून भारतात अवैध वास्तव्य करणारा एका नायजेरियन तरुण स्थानिक सीआयएसएफ तसेच

पासपोर्ट बनावट, भारतात अवैध वास्तव्य : सीआयएसएफ, इमिग्रेशनच्या अधिकाऱ्यांची सतर्कता नागपूर : वर्षभरापासून भारतात अवैध वास्तव्य करणारा एका नायजेरियन तरुण स्थानिक सीआयएसएफ तसेच इमिग्रेशन विभागातील अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे पकडला गेला. इरिक जॉन क्वेम असे त्याचे नाव आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी सकाळी इरिक आला. त्याला गो एअरच्या विमानाने (जी-८/ १४१) मुंबईला जायचे होते. त्याने बोर्डिंग पासही मिळवला. मात्र, त्याचे वर्तन संशयास्पद वाटल्यामुळे सीआयएसएफच्या एका अधिकाऱ्याने इमिग्रेशन विभागातील अधिकाऱ्यांच्या मदतीने त्याचा पासपोर्ट आणि व्हीसा तपासला. पासपोर्ट नंबर सिस्टममध्ये टाकला तेव्हा तो दुसऱ्याच व्यक्तीच्या नावाचा निघाला. त्यामुळे इरिकजवळचा पासपोर्ट बनावट असल्याचे उघड झाले. त्याची चौकशी केली असता धक्कादायक माहिती उघड झाली. इरिक २०१५ मध्ये तीन महिन्याचा मेडिकल व्हीसा घेऊन भारतात आला होता. तीन महिन्यानंतर त्याने मायदेशी परत जायला पाहिजे होते. मात्र, तो भारतात अवैध वास्तव्य करून विविध शहरात फिरत असल्याचे उघड झाल्यानंतर त्याला सोनेगाव पोलिसांच्या हवाली करण्यात आले. (प्रतिनिधी) त्यामुळे आला संशय! इरिकजवळ मुंबईला जाण्याचे विमानाचे तिकीट २६ सप्टेंबरचे होते. मात्र, तो २५ सप्टेंबरलाच विमानतळावर पोहचला होता. सीआयएसएफच्या ज्या अधिकाऱ्याने आज त्याला पकडले, त्याच अधिकाऱ्याने इरिकला रविवारी सकाळी परत पाठविले होते. परंतु इरिकवर त्यांना त्याचवेळी संशय आला होता. प्रकरण विदेशी नागरिकांशी संबंधित असल्याने रविवारी त्यांनी संयम राखला. सोमवारी सकाळी तो विमानतळावर आल्यानंतर त्यांनी इमिग्रेशनच्या अधिकाऱ्यांना पासपोर्टची कसून चौकशी करायला लावली अन् इरिकची बनवाबनवी उघड झाली. कशाला आला होता नागपुरात? इरिक नागपुरात कशाला आला होता, ते स्पष्ट झाले नाही. देशभरातील विमानतळांसह नागपूर विमानतळालाही दहशतवादी संघटनांचा धोका असल्याचे सुरक्षा यंत्रणांनी वेळोवेळी इशारे दिले आहेत. अशात इरिकच्या रुपात एक विदेशी नागरिक नागपूर, मुंबईतील विमानतळासह ठिकठिकाणच्या विमानतळावर वर्षभरापासून बिनधास्त फिरत असल्याने सुरक्षा आणि सतर्कतेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. नागपूरच्या अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे इरिक पकडला गेला. त्याचा नागपुरात येण्याचा उद्देश कोणता होता, ते स्पष्ट झाले नाही. यासंदर्भात पोलीस उपायुक्त दीपाली मासिरकर यांच्याशी चर्चा केली असता, दुभाषकाच्या माध्यमातून इरिकची कसून चौकशी केली जात असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.