शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
2
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
3
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
4
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
5
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
6
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
7
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
8
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
9
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
10
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
11
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
12
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
13
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
14
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
15
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
16
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
17
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
18
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
19
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
20
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात

विमानतळावर पुन्हा नायजेरियन प्रवाशाला पकडले

By admin | Updated: September 30, 2016 03:14 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंटेलिजन्स ब्युरो (आयबी)च्या चमूने गुरुवारी सायंकाळी पुन्हा एका नायजेरियन युवकाला पकडले.

व्हिसाची मुदत संपली होती नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंटेलिजन्स ब्युरो (आयबी)च्या चमूने गुरुवारी सायंकाळी पुन्हा एका नायजेरियन युवकाला पकडले. पेक्स उजूग्वे फर्डिनेंड मेलोडू असे या प्रवाशाचे नाव आहे. त्याच्या व्हिसाची मुदत संपली होती.गुरुवारी सायंकाळी ५.२५ वाजता जेट एअरवेजच्या फ्लाईटने नायजेरियन नागरिक पेक्स उजूग्वे फर्डिनेंड मेलोडू मुंबईला जाणार होता. सूत्रानुसार आयबीला यासंबंधात गुप्त माहिती मिळाली होती. अशीही शंका वर्तविण्यात आली होती की, बेकायदेशीररीत्या इतर तीन व्यक्ती सुद्धा प्रवास करीत आहेत. सध्या पकडल्या गेलेल्या युवकाची विचारपूस केली जात आहे. २६ सप्टेंबर रोजी सुद्धा नागपूर विमानतळावर एका नायजेरियन प्रवाशाला पकडण्यात आले होते. एरिप जॉन कॅमेले असे त्याचे नाव होते. मुंबई आणि नाशिकसह महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये एका वर्षापासून बोगस पासपोर्ट आणि व्हिसासह ते फिरत होते. हा प्रवासी सुद्धा मुंबईला जाण्याच्या तयारीत होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ देशातील संवेदनशील विमानतळापैकी एक आहे. सुरक्षेच्या दृष्टीने विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था कडक आहे. येथून बोगस कागदपत्राद्वारे बाहेर पडणे कठीण आहे. (प्रतिनिधी)