शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अन्य रुग्णालयांमधील बालकांसाठीही आता नागपूरच्या ‘मेयो’त ‘एनआयसीयू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 10:41 IST

मेयो प्रशासनाने ४० खाटांचे ‘एनआयसीयू’ तर १० खाटांचे ‘पेडियाट्रिक इन्टेन्सिव्ह केअर युनिट’ (पीआयसीयू) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्दे४० खाटांची असणार सोय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्या कुणाचे चिमुकले बाळ जीवन-मरणाशी संघर्ष करीत असेल आणि त्याला अद्यावत उपचारापासून वंचित ठेवले जात असेल तर त्या बाळाच्या पालकाची मनस्थिती कशी असेल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. परंतु गेल्या कित्येक वर्षांपासून पालकांची ही तळमळ मेयो रुग्णालय प्रशासनाला कळत असूनही काहीच करता येत नव्हते. कारण, इतर इस्पितळात जन्माला आलेल्या गंभीर बालकांना मेयोच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात (निओनेटल इन्टेन्सिव्ह केअर युनिट) ठेवले नव्हते. त्यांना सामान्य वॉर्डात ठेवले जायचे. यामुळे मृत्यूचा धोका असायचा. याची दखल घेत मेयो प्रशासनाने ४० खाटांचे ‘एनआयसीयू’ तर १० खाटांचे ‘पेडियाट्रिक इन्टेन्सिव्ह केअर युनिट’ (पीआयसीयू) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोन्ही विभाग लवकरच रुग्णांच्या सेवेत असेल.इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) विदर्भासह मध्य प्रदेश, छत्तीसगड व तेलंगणा या राज्यातून अतिजोखमीच्या माता प्रसूतीसाठी दाखल होत असतात. मेयोमध्ये दरवर्षी साधारणत: १० हजार नवजात बालकांचा जन्म होतो. यातील अतिजोखमीची १२०० वर बालरुग्ण दाखल करण्याची वेळ येते.मात्र मेयोमध्ये केवळ सात खाटांचेच ‘एनआयसीयू’ आहे. यामुळे केवळ मेयोमध्येच जन्म घेणाऱ्या बालकांना या विभागात दाखल केले जाते. बाहेरुन येणारे रुग्ण कितीही गंभीर असले तरी त्यांना सामान्य वॉर्डात ठेवले जाते. येथे आवश्यक सोयी नसल्याने मृत्यूचा धोका नेहमी राहायचा. याची दखल बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. सी.एम. बोकडे यांनी घेतली. ४० खाटांचे ‘एनआयसीयू’ व १० खाटांचे ‘पीआयसीयू’ सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला. मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांनीही यात पुढाकार घेतला. त्यांनी जागा उपलब्ध करून देऊन, आवश्यक यंत्रसामुग्रीही उपलब्ध करून देणार आहे.मेयोमधील ‘सर्जिकल कॉम्प्लेक्स’मध्ये ‘आर्थाेपेडीक’ वॉर्ड व शस्त्रक्रिया गृह स्थानांतरित झाल्याने ही जागा रिकामी झाली आहे. अधिष्ठाता डॉ. केवलिया यांनी रिकाम्या झालेल्या वॉर्ड क्रमांक १ मध्ये ४० खाटांचे ‘एनआयसीयू’ उभारण्याला मंजुरी दिली. यात २० खाटा बाहेरील बालकांसाठी तर २० खाटा रुग्णालयातील बालकांसाठी राखीव असणार आहे. तर आर्थाेपेडीक विभागाच्या रिकाम्या झालेल्या शस्त्रक्रिया गृहात १० खाटांचे ‘पीआयसीयू’ होणार आहे.

न्युओनेटल व्हेंटिलेटरने सज्ज असणार विभागप्राप्त माहितीनुसार, ‘एनआयसीयू’मध्ये न्युओनेटल व्हेंटिलेटर, बेडसाईड मॉनिटर्स, सीपीएपी, फोटोथेरपी युनिट यासारख्या अद्ययावत उपकरणांचा समावेश असणार आहे. यामुळे बालकांना अद्ययावत उपचार मिळतील.

प्रस्तावित विभाग लवकरच रुग्णसेवेतमेयोमध्ये केवळ सात खाटांचेच ‘एनआयसीयू’ आहे. यामुळे हा विभाग नेहमीच रुग्णाने फुल्ल असतोे. बाहेरून आलेल्या बालकांसाठी ही सोय देणे अडचणीचे जात होते. याची दखल घेऊन ‘एनआयसीयू’ व ‘पीआयसीयू’चा प्रस्ताव तयार करण्यात आला. लवकरच हे दोन्ही विभाग रुग्णसेवेत असण्याची शक्यता आहे.-डॉ. सी.एम. बोकडे, अधिष्ठाता, मेयो

टॅग्स :Medicalवैद्यकीय