कोराडीत रचला इतिहास : कामठी तालुक्यात भाजपला यशकोराडी : ग्रामपंचायत निवडणुकीत कामठी तालुक्यात भाजपला अभूतपूर्व यश मिळाले. याबद्दल निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. गेल्या १५ वर्षांपासून कोराडी ग्रामपंचायत ही काँग्रेसच्या ताब्यात होती. मात्र यावेळी भाजपने १७ पैकी सर्वच जागांवर कब्जा मिळविला. यासोबतच खरबी -बहादुरा ग्रामपंचायतमध्ये १७ पैकी १५ जागांवर विजय मिळविला. तसेच संपूर्ण कामठी विधानसभा मतदारसंघातही भाजपची घोडदौड कायम राहिली. त्याचे निमित्त साधून निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. कोराडीतील प्रभाग क्रमांक - १ मधून नरेंद्र धनुले व सुनीता चिंचूरकर, प्रभाग क्रमांक - २ मधून रवींद्र मोहनकर, निर्मला मोरई व कल्पना कामटकर, प्रभाग क्रमांक - ३ मधून राजकुमार शिवणकर, अर्चना मैंद व देवेंद्र सावरकर, प्रभाग क्रमांक - ४ मधून हेमराज चौधरी, जितेंद्र बानाईत व श्रावणी वाघमारे, प्रभाग क्रमांक - ५ मधून सोनाली वानखेडे, कैलास सोमकुवर व बेबी खुबेले आणि प्रभाग क्रमांक - ६ उमेश निमोने, अर्चना दिवाणे आणि वंदना रामटेके विजयी झाल्या. तर बहादुरा ग्रामपंचायतमध्ये राजकुमार वंजारी, नरेंद्र नांदूरकर, रमेश कुरळकर, एजाज घाणीवाला, विजय नागरे, सिद्धार्थ नगरारे, दिलीप चापेकर, राधिका ढोमणे, गीता पराते, पुष्पा गायधने, गीता सूर्यवंशी, संगीता मंडाळे, वनिता उरकुडकर, पार्वती गुजरकर, पुष्पा पांडे यांचा विजयी झालेल्यांमध्ये समावेश आहे. निवडून आलेल्या या सर्वांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अरविंद खोबे, संजय मैंद, संजय कडू, ज्योती बावनकुळे, गीता बावनकुळे, विठ्ठल निमोने, रामदास गायधने, संजय वाशीमकर, भास्कर चिंचूरकर, रमेश ठाकरे, अशोक बिरखेडे, दिलीप सावरकर, अविनाश हेडाऊ यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नवनियुक्त ग्रा.पं. सदस्यांचा सत्कार
By admin | Updated: August 9, 2015 02:47 IST