शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षात येणार ई-म्युटेशन

By admin | Updated: December 1, 2014 00:47 IST

राज्यातील फडणवीस सरकारकडून आगामी नवीन वर्षापासून सरकारी सेवा अधिक गतिशील आणि सुकर करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. त्यात ‘ई-म्युटेशन’ आणि ‘ई ७/१२’चाही समावेश राहणार आहे.

हस्तलिखित ७/१२ होणार बाद: ‘डिजीटल इंडिया’कडे वाटचालनागपूर : राज्यातील फडणवीस सरकारकडून आगामी नवीन वर्षापासून सरकारी सेवा अधिक गतिशील आणि सुकर करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. त्यात ‘ई-म्युटेशन’ आणि ‘ई ७/१२’चाही समावेश राहणार आहे.केंद्र सरकारचा ‘डिजीटल इंडिया’ही योजना राज्यात राबविण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानस आहे. त्या अनुषंगाने त्यांनी २१ नोव्हेंबरला मुंबईत बैठक घेऊन राज्यातील ‘ई-सेवां’चा आढावा घेतला तसेच डिजीटल इंडिया’ची राज्यात अंमलबजावणी करण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली. ‘ई-सेवां’चा आढावा घेताना मुख्यमंत्र्यांनी राज्यात ‘ ई-म्युटेशन’ बंधनकारक करण्याच्या सूचना केल्या त्यासाठी १ जानेवारी २०१५ पर्यंतची मुदत देण्यात आली. यासंदर्भातील जबाबदारी महसूल व जमाबंदी आयुक्तांकडे देण्यात आली. ‘‘ई -म्युटेशन’च्या संदर्भात अधिकाऱ्यांकडून ७/१२ उतारा अद्ययावत होत नसल्याचे कारण पुढे केले जाते. मात्र यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे कारण ऐकून घेतले जाणार नाही, असे स्पष्टपणे बजावले. दरम्यान काळात ७/१२ रेकॉर्ड डिजीटलायझेशन करण्याच्या कामाला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या. १ एप्रिल २०१५ नंतर ७/१२ ची संकेतस्थळावरून काढलेली आणि तलाठ्याकडून घेतलेली हस्तलिखित प्रत यात फरक राहणार नाही तसेच अशा पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे १ एप्रिल २०१५ नंतर हस्तलिखित ७/१२ देण्याची पद्धत बाद होणार आहे. आरटीआय ची प्रक्रियाही पुढच्या काळात आॅनलाईन करण्यात येणार आहे. मंत्रालयात १ जानेवारीपासून तर राज्यात १ एप्रिल २०१५ पासून ती सुरू करण्याची मुदत देण्यात आली आहे.(प्रतिनिधी)