शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नवीन कामाचे कार्यादेश थांबविले

By admin | Updated: June 24, 2015 02:54 IST

आर्थिक स्थिती बिकट असल्याने व तिजोरीत पैसा जमा होण्याची गती संथ झाल्याने महापालिका प्रशासनाने नवीन कार्यादेश देण्याचे थांबविले आहे.

महापालिका : आर्थिक संकटामुळे निर्णयनागपूर : आर्थिक स्थिती बिकट असल्याने व तिजोरीत पैसा जमा होण्याची गती संथ झाल्याने महापालिका प्रशासनाने नवीन कार्यादेश देण्याचे थांबविले आहे. मनपाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे २०० कोटींची बिले प्रलंबित आहेत. काही दिवसांपूर्वी वित्त विभागाने यासंदर्भात आयुक्त श्रावण हर्डीकर यांना अवगत केले आहे. परंतु त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच्या दोन महिन्यापर्यंत अपेक्षेच्या तुलनेत ९० कोटींचे उत्पन्न कमी झाले. एलबीटीमुळे उत्पन्नावर परिणाम झाला आहे. नियमित होणारी आवक घटली आहे. याचा विचार करून आयुक्तांनी १२९४.७५ कोटींचा अर्थसंकल्प दिला होता. त्यानुसार अर्थसंकल्पापूर्वी एप्रिल व मे महिन्यात २१५.७९ कोटींचे उत्पन्न अपेक्षित होते. परंतु प्रत्यक्षात १२४.२४ कोटींचा महसूल जमा झाला. दुसरीकडे दर महिन्याच्या खर्चात वाढ झाली असून, हा खर्च ६५ वरून ६८ कोटींवर गेला आहे. मनपातील कंत्राटदारांची १५० कोटींची बिले प्रलंबित असल्याची माहिती कंत्राटदार संघटनेचे विजय नायडू यांनी दिली. दुसरीकडे लेखा व वित्त अधिकाऱ्यांच्या मते, ५० कोटींची बिल देणे आहे. आवक घटल्याने काही दिवस नवीन कार्यादेश थांबविण्यात आले आहे. वेतन देण्यालाही विलंब होत असल्याची कबुली हर्डीकर यांनी दिली. (प्रतिनिधी)