शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

हे तर नवलच ! महिलेला भरायचे होते चिल्लर पैशांनी वीज बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:07 IST

राकेश घानोडे नागपूर : वाचून कुणालाही नवल वाटेल; पण हे खरे आहे. एका महिलेला ३६ हजार २० रुपयाचे वीज ...

राकेश घानोडे

नागपूर : वाचून कुणालाही नवल वाटेल; पण हे खरे आहे. एका महिलेला ३६ हजार २० रुपयाचे वीज बिल चक्क १, २, ५ व १० रुपये... अशा चिल्लर नाण्यांनी भरायचे होते. त्यासाठी तिने महावितरणला पत्रही लिहिले होते. महावितरणने असे करता येणार नसल्याचे कळविल्यानंतरदेखील महिला शांत बसली नाही. तिने अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेतली. आयोगानेही या संदर्भात कायदेशीर तरतूद नसल्याचे सांगून तिची मागणी फेटाळून लावली.

लक्ष्मी ठाकरे असे महिलेचे नाव असून त्या कळमेश्वर येथील रहिवासी आहेत. त्यांना फेब्रुवारी-२०२० ते जानेवारी-२०२१ या कालावधीकरिता ३६ हजार २० रुपयाचे बिल देण्यात आले आहे. हे बिल वेळेत भरण्यात न आल्यामुळे महावितरणने १२ मार्च २०२१ रोजी वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यावर आक्षेप घेऊन ठाकरे यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती. चिल्लर पैशांनी वीज बिल जमा करण्यास तयार असताना करण्यात आलेली ही कारवाई अवैध आहे, असे त्यांचे म्हणणे होते. ग्राहक आयोगाने कायदेशीर बाबी तपासल्यानंतर ठाकरे याच अवैधपणे वागत असल्याचे स्पष्ट केले. महावितरणने बँक ऑफ महाराष्ट्रच्या पत्राचा संदर्भ देऊन एक रुपयावरील मूल्याच्या चिल्लर पैशांद्वारे १००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम स्वीकारता येत नसल्याचे कळविले होते. असे असताना ठाकरे यांनी थकीत वीज बिल न भरता रोज १००० रुपये जमा करण्याची मुभा मागितली. ठाकरे यांची ही कृती अयोग्य आहे व या कृतीला कुठलाही कायदेशीर आधार नाही, अशी समज आयोगाने दिली. महावितरणने वीज बिल जमा करण्यासाठी ग्राहकाच्या सोयीसाठी रोख रक्कम, धनादेश, डिमांड ड्राफ्ट, ऑनलाईन पेमेंट, इत्यादी कायदेशीर पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. ग्राहकांनी त्याचे पालन करायला पाहिजे. ग्राहकावर थकबाकीची एकमुस्त रक्कम जमा करण्याचे कायदेशीर बंधन आहे, असे आयोगाने सांगितले. आयोगाचे अध्यक्ष संजय पाटील व सदस्य अविनाश प्रभुणे यांनी हा निर्णय दिला.

--------------

ठाकरे यांच्यावर ताशेरे

वीज बिल जमा करण्यातील अनियमितता व वाढलेली थकबाकी पाहता ठाकरे या स्वत: दोषी असल्याचे आणि असे असतानादेखील त्या आडमुठेपणाने विनाकारण पत्रव्यवहार करून थकबाकी जमा करण्यास विलंब करीत असल्याचे सिद्ध होते. तसेच, त्यांनी कायदेशीर तरतुदीचा अयोग्य अर्थ लावून अनावश्यक वाद उपस्थित केल्याचे दिसते. कायद्याचे अज्ञान हे बचावाचे कारण ठरू शकत नाही; त्यामुळे ठाकरे या सहानुभूती मिळण्यास पात्र नाहीत, असे ताशेरेही आयोगाने हा निर्णय देताना ओढले.