शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचा सन्मान वाढविणारी नवी परंपरा

By admin | Updated: September 21, 2015 02:52 IST

लोकमतने महिलांना सन्मानित करण्याच्या उद्देशाने एका खास उपक्रमाला प्रारंभ केला आहे.

नागपूर : लोकमतने महिलांना सन्मानित करण्याच्या उद्देशाने एका खास उपक्रमाला प्रारंभ केला आहे. या अंतर्गत ‘तिचा गणपती’ हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. लोकमत सखी मंचच्या संयोजनात आणि अष्टविनायक गणेशोत्सव मंडळाच्या सहकार्याने व्यंकटेशनगर, नंदनवन ब्लॉक, एच. घरकुल येथे हा गणेशोत्सव महिलांतर्फे जोशात आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवाच्या चतुर्थ दिनी रविवारी प्रमुख अतिथी प्रादेशिक समाज कल्याण उपायुक्त रजनी झोड आणि सेंट झेव्हियर्स स्कूल, हिंगणाच्या प्राचार्य पल्लवी दाढे यांच्या हस्ते गणेशाची आरती करण्यात आली. याप्रसंगी मंडळाच्या सर्व सदस्य प्रामुख्याने उपस्थित होत्या. लोकमतने महिलांना सन्मान देण्यासाठी सुरू केलेला हा उपक्रम अनोखा असल्याचे मत अतिथींनी व्यक्त केले. यामुळे एक नवी परंपरा सुरू झाली, असे त्या म्हणाल्या. ‘तिचा गणपती’ या उत्सवात संपूर्ण व्यवस्थापन महिलांचेच आहे. दररोज महिलांच्याच हस्ते येथे आरती करण्यात येते. गणेशोत्सवा दरम्यान येथे रोज सायंकाळी ७ वाजता आरती आणि विविध स्पर्धांचे आयोजन महिलांतर्फेच करण्यात आले आहे. लोकमतच्या सर्व महिला वाचकांनी तिचा गणपती या महिलांना सन्मान देणाऱ्या उत्सवात अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन लोकमततर्फे करण्यात आले आहे. लोकमत सखी मंच महिलांचा मंच आहे. या मंचने आपल्या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून केवळ महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचेच कार्य केले नाही तर त्यांना आत्मसन्मान लाभावा यासाठीही अनेक उपक्रम राबविले आहेत. (प्रतिनिधी)