शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
2
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
3
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
4
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
5
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
6
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
7
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
8
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
9
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
10
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
11
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
12
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
13
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
14
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
15
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
16
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
17
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
18
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
19
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
20
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस

विमानतळाच्या खासगीकरणासाठी नवीन निविदा लवकरच काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:17 IST

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरणाची प्रक्रिया दुसऱ्यांदा नव्याने लवकरच काढण्यात येणार असल्याची महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे ...

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या खासगीकरणाची प्रक्रिया दुसऱ्यांदा नव्याने लवकरच काढण्यात येणार असल्याची महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसी) उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी मिहान प्रकल्पाच्या आढावा बैठकीत दिली. सहा महिन्यापूर्वी पदभार स्वीकारलेल्या कपूर यांनी मिहान प्रकल्पाची गुरुवारी पहिल्यांदा पाहणी केली, हे विशेष. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एमएडीसीचे अध्यक्ष आहेत.

यापूर्वी विमानतळाच्या खासगीकरणासाठी जीएमआर कंपनीने लावलेली अंतिम आर्थिक बोली महाविकास आघाडी सरकारने रद्द केली आहे. त्यामुळे विमानतळाच्या खासगीकरणाची संपूर्ण प्रक्रिया नव्याने सुरू करण्यात येणार आहे. सरकारच्या निर्देशानुसार विमानतळाच्या खासगीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. बैठकीत मिहान इंडिया लिमिटेडतर्फे (एमआयएल) संचालित विमानतळाचे वरिष्ठ संचालक आबिद रुही यांनी विमानतळाच्या विकास कार्याची माहिती दिली. प्रवाशांच्या गरजेनुसार विकास कामे करण्यात येत आहेत. खासगीकरणाचा प्रस्ताव आल्याने नवीन काम करण्यात येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी व मिहान इंडिया लिमिटेडच्या बैठकीत जीएमआरच्या आर्थिक बोलीला एकूण उत्पन्नातील वाट्याच्या प्रमाणावर मार्च २०१९ मध्ये अंतिम मंजुरी दिली होती. त्यानुसार कंपनीने एपीव्हीकरिता भागीदार कंपनीही निवडली होती. पण सरकारने संपूर्ण कंत्राट देण्याची प्रक्रियाच रद्द केली. खासगीकरणासाठी जीएमआर कंपनीसह टाटा रिअ‍ॅलिटी, जीव्हीके, पीएनबी इन्फ्रोटेक व एस्सेल इन्फ्रा या पाच कंपन्यांनी निविदा सादर केली होती. खासगीकरणात पहिल्या टप्प्यात जवळपास ७०० कोटींचा विकास आराखडा तयार केला आहे. त्यात ७५ हजार चौरस मीटर जागेवर टर्मिनल इमारतीचे बांधकाम आणि चार हजार मीटर लांब व ६० मीटर रुंद दुसरी धावपट्टी तयार करण्यात येणार आहे.

मिहानमध्ये परिवहन सेवा सुरू करण्यासाठी मार्च महिन्यात मनपा, नासुप्र, परिवहन विभाग, मेट्रोसोबत मार्च महिन्यात चर्चा करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. अमरावती विमानतळासाठी निविदा लवकरच काढण्यात येणार असल्याचे कपूर यांनी बैठकीत स्पष्ट केले.

बैठकीत एमएडीसी व एमआयएलचे अधिकारी, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल, माजी अध्यक्ष नितीन लोणकर, सचिव श्रीकांत कोठारकर, वेदचे अध्यक्ष शिवकुमार राव आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

मिहानमध्ये नवीन उद्योगासाठी

जागेचे दर कमी करावेत

मिहानमध्ये अनेक लहान-मोठे उद्योग येण्यास उत्सुक आहे. पण जागेचे दर पाहता नवे उद्योग येत नाही. त्यामुळे लहान उद्योगांसाठी जागेचे दर कमी करावेत, अशी मागणी बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे सचिव श्रीकांत कोठारकर यांनी बैठकीत केली. मिहानमध्ये ज्या कंपन्यांनी जागा घेतल्या आहेत, पण अजूनही उद्योग सुरू केले नाहीत, अशा उद्योजकांकडून जागा परत घेण्यात येणार असून त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.