शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
5
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
6
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
7
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
8
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
9
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
10
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
11
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
12
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
13
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
14
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
15
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
16
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
17
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
18
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
19
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?

दिवाळीच्या सुट्यानंतर हायकोर्टात नवीन रोस्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 10:45 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दिवाळीच्या सुट्यांनंतर नवीन रोस्टर लागू होणार आहे. हायकोर्टाला ३ ते १८ नोव्हेंबरपर्यंत दिवाळीच्या सुट्या आहेत. १९ नोव्हेंबरपासून नवीन रोस्टरसह नियमित कामकाजाला सुरुवात होईल.

ठळक मुद्दे१९ पासून नियमित कामकाज न्या. रवी देशपांडे यांच्याकडे जनहित याचिका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दिवाळीच्या सुट्यांनंतर नवीन रोस्टर लागू होणार आहे. हायकोर्टाला ३ ते १८ नोव्हेंबरपर्यंत दिवाळीच्या सुट्या आहेत. १९ नोव्हेंबरपासून नवीन रोस्टरसह नियमित कामकाजाला सुरुवात होईल.नवीन रोस्टरमध्ये न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्याकडे जनहित याचिका, १९९८ व त्यापुढील सर्व सम वर्षांतील दिवाणी रिट याचिका, सर्व लेटर्स पेटेन्ट अपील्स, न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व स्वप्ना जोशी यांच्याकडे विषम वर्षांतील फौजदारी प्रकरणे तर, न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांच्याकडे १९९७ व त्यापुढील सर्व विषम वर्षांतील दिवाणी रिट याचिका, प्रथम अपील्स, कुटुंब न्यायालय अपील्स व सम वर्षांतील फौजदारी प्रकरणांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.एक सदस्यीय न्यायपीठातील न्या. झेड. ए. हक यांच्याकडे सम वर्षांतील दिवाणी रिट याचिका, सीआरपीसी कलम ४८२ व ४०७ अंतर्गतचे अर्ज, न्या. विनय देशपांडे यांच्याकडे फौजदारी अपील्स व अर्ज, फौजदारी याचिका, न्या. रोहित देव यांच्याकडे द्वितीय अपील्स, दिवाणी सुधार अर्ज, न्या. मनीष पितळे यांच्याकडे विषम वर्षांतील दिवाणी रिट याचिका, न्या. अरुण उपाध्ये यांच्याकडे प्रथम अपील्स व अपील्स फ्रॉम आर्डर्स, जिल्हा न्यायालयातील दिवाणी अवमानना संदर्भ, सर्व किरकोळ अर्ज तर, न्या. मुरलीधर गिरटकर यांच्याकडे नियमित व अटकपूर्व जामीन अर्जांची जबाबदारी राहील.

अशी राहील सुट्यांमधील व्यवस्थादिवाळीच्या सुट्यांमध्ये तातडीने सुनावणी घेण्याची गरज असणारी प्रकरणे ऐकण्यासाठी न्या. अरुण उपाध्ये व न्या. मनीष पितळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पहिल्या आठवड्यामध्ये न्या. उपाध्ये तर, दुसऱ्या आठवड्यामध्ये न्या. पितळे हे मंगळवारी व शुक्रवारी या दोन दिवशी न्यायालयीन कामकाज करतील.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय