शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नवीन नर्सिंग महाविद्यालयांना मान्यता देण्यास मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 22:15 IST

पूर्व परवानगी घेतल्याशिवाय राज्यामध्ये कोणत्याही नवीन नर्सिंग महाविद्यालयास मान्यता देण्यात येऊ नये असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी महाराष्ट्र स्टेट बोर्ड आॅफ नर्सिंग अ‍ॅन्ड पॅरामेडिकल एज्युकेशनला दिला. त्यामुळे बोर्डाला नवीन नर्सिंग महाविद्यालयास मान्यता देण्यापूर्वी उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे.

ठळक मुद्देहायकोर्टाचा अंतरिम आदेश : पूर्व परवानगी घ्यावी लागेल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पूर्व परवानगी घेतल्याशिवाय राज्यामध्ये कोणत्याही नवीन नर्सिंग महाविद्यालयास मान्यता देण्यात येऊ नये असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी महाराष्ट्र स्टेट बोर्ड आॅफ नर्सिंग अ‍ॅन्ड पॅरामेडिकल एज्युकेशनला दिला. त्यामुळे बोर्डाला नवीन नर्सिंग महाविद्यालयास मान्यता देण्यापूर्वी उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे.१३ जुलै २०१८ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र स्टेट बोर्ड आॅफ नर्सिंग अ‍ॅन्ड पॅरामेडिकल एज्युकेशनला राज्यामध्ये नवीन नर्सिंग महाविद्यालयांना मान्यता देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले होते. त्या तरतुदीविरुद्ध वर्धा येथील पवन बहुउद्देशीय शिक्षण व सामाजिक विकास संस्थेने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. बोर्डाने संबंधित अधिकार कोणत्या परिस्थितीत व कशाप्रकारे वापरायचे याचे निकष निर्णयात नमूद करण्यात आले नाहीत. यापूर्वी ६ आॅक्टोबर २०१२ रोजी जारी शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलला नवीन नर्सिंग महाविद्यालयांना मान्यता देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले होते. त्या निर्णयामध्ये कौन्सिलने बृहत आराखड्याप्रमाणे यासंदर्भात कार्यवाही करावी असे स्पष्ट करण्यात आले होते. परंतु, १३ जुलै २०१८ रोजीच्या शासन निर्णयात असे बंधन नसल्यामुळे नवीन नर्सिंग महाविद्यालयांना मनमानी पद्धतीने मान्यता दिली जाऊ शकते. तसे झाल्यास नर्सिंग अभ्यासक्रमांना आवश्यक विद्यार्थी मिळणे कठीण जाईल. नर्सिंग शिक्षणाचा दर्जा खालावला जाईल. नर्सिंग शिक्षणाचे बाजारीकरण होईल. त्यातून अनिवार्य सुविधा नसलेली महाविद्यालये सुरू होतील. परिणामी, वादग्रस्त निर्णयामध्ये आवश्यक सुधारणा करण्यात यावी असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.राज्य सरकार व इतरांना नोटीसप्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने प्राथमिक तथ्ये लक्षात घेता हा अंतरिम आदेश दिला. तसेच, राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव, इंडियन नर्सिंग कौन्सिलचे सचिव आणि महाराष्ट्र स्टेट बोर्ड आॅफ नर्सिंग अ‍ॅन्ड पॅरामेडिकल एज्युकेशनचे संचालक यांना नोटीस बजावून याचिकेतील मुद्यांवर दोन आठवड्यात उत्तर दाखल करण्यास सांगितले. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. आनंद परचुरे, अ‍ॅड. रोहित वैद्य व अ‍ॅड. देवदत्त देशपांडे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयcollegeमहाविद्यालय