शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नवीन अधिसूचना या आठवड्यातच

By admin | Updated: July 25, 2014 00:48 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून महाविद्यालयांमध्ये किमान शिक्षक भरतीच्या निकषांमध्ये लवकरच बदल करण्यात येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात गठित करण्यात आलेल्या तायवाडे

नागपूर विद्यापीठ : किमान शिक्षक भरतीस मिळणार मुदतवाढनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून महाविद्यालयांमध्ये किमान शिक्षक भरतीच्या निकषांमध्ये लवकरच बदल करण्यात येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात गठित करण्यात आलेल्या तायवाडे समितीच्या अहवालाला विद्यापीठाने मान्यता दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यानुसार ५० टक्के नियमित शिक्षक भरतीसाठी वर्ष अखेरपर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. या अटींमुळे निर्माण झालेली प्रवेशाची कोंडीदेखील लवकरच दूर होण्याची चिन्हे आहेत.२०१४-१५ या शैक्षणिक सत्रात प्रवेशासाठी महाविद्यालयांत मंजूर क्षमतेच्या ५० टक्के पूर्णकालीन शिक्षकांची नियुक्ती करण्याची अट विद्यापीठाने लावली आहे. पारंपरिक, व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सर्व महाविद्यालयांना ही अट आहे. महाविद्यालयांना जाचक ठरणाऱ्या या अटींवर फेरविचार करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी विद्यापीठ प्राधिकरणांतील सदस्य, महाविद्यालये, प्राचार्य व टीचर्स फोरम इत्यादींकडून करण्यात आली. त्यानुसार यासाठी डॉ.बबन तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. या समितीने आपला अहवाल मागील आठवड्यात विद्यापीठाकडे सादर केला. ५० टक्के नियमित शिक्षक नियुक्तीची अट पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात यावी, अशी सूचना या समितीने दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या समितीच्या शिफारशींनुसार विद्यापीठाकडून या आठवड्यातच किमान शिक्षक भरतीच्या निकषांसंदर्भात नवीन अधिसूचना काढण्याची शक्यता आहे.(प्रतिनिधी)