शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

मनपा स्थायी समिती बैठक रद्द करण्यावरून नवा वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 20:39 IST

स्थायी समितीची येत्या बुधवार २० मे रोजीची प्रस्तावित बैठक रद्द करण्यासंदर्भात प्रभारी निगम सचिव रंजना लाडे यांनी स्थायी समिती अध्यक्षांना पत्र दिले आहे. नागपूर शहरात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी फि जिकल डिस्टन्स ठेवण्याच्या दृष्टीने मनपा आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार ही बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती या पत्रातून देण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे आदेश : स्थायी समिती अध्यक्ष देणार प्रशासनाला पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्थायी समितीची येत्या बुधवार २० मे रोजीची प्रस्तावित बैठक रद्द करण्यासंदर्भात प्रभारी निगम सचिव रंजना लाडे यांनी स्थायी समिती अध्यक्षांना पत्र दिले आहे. नागपूर शहरात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी फि जिकल डिस्टन्स ठेवण्याच्या दृष्टीने मनपा आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार ही बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती या पत्रातून देण्यात आली आहे. मात्र प्रशासनाकडून विविध बैठकांचे आयोजन सुरू आहे. यासाठी फि जिकल डिस्टन्सचा प्रश्न निर्माण होत नाही. मग स्थायी समितीच्या बैठकीलाच हा नियम लागू होतो का ? असा प्रश्न उपस्थित करून या संदर्भात स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके मनपा प्रशासनाला पत्र देणार असल्याने यातून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.स्थायी समितीची येत्या बुधवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा, शहरातील पाणीपुरवठा व अन्य अत्यावश्यक सेवा संदर्भात चर्चा केली जाणार आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. ते दूर करण्याची गरज आहे. याचा विचार करता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.तसेही महापालिका मुख्यालयात मान्सूनपूर्व तयारीचा आढावा, कोविड-१९ संदर्भात बैठका घेतल्या जात आहे. या बैठकांना उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांहून अधिक संख्या स्थायी समितीच्या बैठकीला राहणार नाही. त्यामुळे स्थायी समितीची बैठक रद्द करण्यासंदर्भातच नियम आहे का? असा सवाल करून निगम सचिवांनी दिलेल्या पत्रासंदर्भात मनपा प्रशसानाला सोमवारी पत्र देणार असल्याची माहिती पिंटू झलके यांनी दिली.महापालिका कायद्यात सभागृह व स्थायी समितीला विशेष अधिकार आहेत. असे असताना प्रशासनाने चर्चा न करता बैठक रद्द करण्याचे आदेश काढल्याने समितीने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका