शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

मिहानमध्ये नवीन कंपन्यांकडून विचारणा

By admin | Updated: November 25, 2014 00:54 IST

मिहानमधील उद्योगांना स्वस्त दरात वीज मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ नोव्हेंबरला केली होती. परिणामी २४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून वीज पुरवठा सुरू झाला.

स्वस्त विजेचा परिणाम : फूड पार्कची योजनानागपूर : मिहानमधील उद्योगांना स्वस्त दरात वीज मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३ नोव्हेंबरला केली होती. परिणामी २४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून वीज पुरवठा सुरू झाला. एमएडीसीने दिलेल्या माहितीनुसार विजेचे प्रति युनिट दर ४.३९ रुपये असल्याने देश-विदेशातील कंपन्यांकडून मिहानमध्ये उद्योग उभारणीसाठी विचारणा होऊ लागली आहे. तीन हजार एकर जागा रिक्तमुख्यमंत्री नागपूरचे असल्याने मिहानमध्ये भविष्य आहे, असे उद्योजकांचे मत आहे. सध्या तीन हजार एकर जागा रिक्त आहे. उद्योजकांना आधुनिक उद्योग सुरू करण्याची संधी आहे. ज्यांनी जागा विकत घेतली आणि अद्याप उद्योग सुरू न केलेल्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन प्रयत्नरत आहे. पण ज्यांना उद्योग सुरूच करायचा नाही, अशांकडून जागा परत घेण्याच्या हालचालीही शासनाने सुरू केल्या आहेत. या जागा नवीन कंपन्यांना देण्याची तयारी एमएडीसीने चालविली आहे. एमएडीसीच्या मुंबई येथील कार्यालयात चार नवीन कंपन्यांनी प्रस्ताव दिल्याची माहिती आहे. प्रस्तावित प्रकल्पाला मूर्तरूप येईपर्यंत कंपन्यांची नावे जाहीर करणे योग्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. फेब्रुवारीमध्ये अ‍ॅडव्हान्टेज विदर्भविदर्भात उद्योगांची नव्याने उभारणी आणि विकासासाठी ‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ’ हा महत्त्वपूर्ण इव्हेंट फेब्रुवारी-२०१५ मध्ये घेण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व औद्योगिक संघटनांना निमंत्रित करण्यात येत आहे. यात मिहान इंडस्ट्रीज असोसिएशनचा महत्त्वपूर्ण सहभाग राहणार आहे. आघाडी सरकारने पूर्वी घेतलेल्या या इव्हेंटचा विदर्भाला फायदा झाला होता. मुख्यमंत्री विदर्भाचेच असल्याने या इव्हेंटला आता आगळेवेगळे महत्त्व राहील. (प्रतिनिधी)२३ कंपन्यांना वीज पुरवठामिहानमध्ये सध्या २३ कंपन्या कार्यरत असून ४ मेगावॅट विजेचा पुरवठा सुरू आहे. पूर्वीपेक्षा विजेचा दर अर्धा आहे. मुळात उत्पादक युनिटसाठी विजेचे दर महत्त्वाचे ठरतात. त्यावर उत्पादनाची गती अवलंबून आहे. स्वस्त विजेमुळे अनेक उद्योग मिहानमध्ये सुरू होतील. छोट्या उद्योगांनाही शासनाने संधी द्यावी. लवकरच फूडपार्कसाठी मिहानमध्ये १५० एकर जागेची मागणी मुख्यमंत्र्यांकडे लावून धरण्यात येईल. विदर्भातील फूड उत्पादकांना या जागेत उद्योग सुरू करता येईल. मिहानमध्ये विजेचा प्रति युनिट दर ४.३९ रुपये आहे. तसे परिपत्रकही शासनाने काढले आहे. मनोहर भोजवानी, अध्यक्ष, मिहान इंडस्ट्रीज असोसिएशन.