शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पवारांचा दौरा घेणार नव्या अध्यक्षांची परीक्षा

By admin | Updated: September 20, 2015 03:08 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार २३ व २४ सप्टेंबर रोजी विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. पवारांचा हा दौरा नवनियुक्त शहर व जिल्हाध्यक्षांची परीक्षा घेणारा ठरणार आहे.

शहर व जिल्ह्याची बैठक : संघटन बळकट करण्याचे आवाहननागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार २३ व २४ सप्टेंबर रोजी विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. पवारांचा हा दौरा नवनियुक्त शहर व जिल्हाध्यक्षांची परीक्षा घेणारा ठरणार आहे. याची जाणीव असल्यामुळे नवनियुक्त दोन्ही अध्यक्ष जोमाने कामाला लागले आहेत. शनिवारी गणेशपेठेतील पक्ष कार्यालयात तयारीसाठी झालेल्या बैठकीत याचा प्रत्यय झाला. बऱ्याच दिवसानंतर राष्ट्रवादीचे पक्ष कार्यालय ‘हाऊस फुल’ झाल्याचे पहायला मिळाले. शरद पवार २३ सप्टेंबर रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पिंपरी बुटी येथे शेतकऱ्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. २४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता नागपुरात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतील. त्यानंतर दुपारी २ वाजता विदर्भातील पदाधिकाऱ्यांचा देशपांडे सभागृहात मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या दोन दिवसीय दौऱ्यासाठी राष्ट्रवादी कामाला लागली आहे. शनिवारी नवनियुक्त शहर अध्यक्ष माजी मंत्री अनिल देशमुख व जिल्हाध्यक्ष माजी मंत्री रमेश बंग यांनी पक्ष कार्यालयात शहर व ग्रामीण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची स्वतंत्र बैठक घेतली. दोन्ही बैठकांना देशमुख व बंग उपस्थित होते. न येणारे कार्यकर्तेही आज पक्ष कार्यालयात पोहचले होते. बऱ्याच दिवसांनी पक्ष कार्यालय खचाखच भरले. या वेळी दोन्ही नेत्यांनी पक्ष संघटना मजबूत करा, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडा, असे आवाहन केले. दोन्ही बैठकांना आ. प्रकाश गजभिये, दीनानाथ पडोळे, माजी शहर अध्यक्ष अजय पाटील, माजी जिल्हाध्यक्ष बंडू उमरकर, अतुल लोंढे, प्रगती पाटील, राजू नागुलवार, वेदप्रकाश आर्य, प्रवीण कुंटे, नुतन रेवतकर, राजाभाऊ टाकसाळे, अविनाश गोतमारे, गंगाप्रसाद ग्वालबंसी, रमण ठवकर, दीप्ती काळमेघ, सतीश इटकेलवार, विशाल खांडेकर, शब्बीर विद्रोही, शैलेंद्र तिवारी, ईश्वर बाळबुधे, वर्षा शामकुळे, अशोक काटले, राजेश माटे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)