शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

नवीन शिक्षक नियुक्तीवरील बंदी अवैध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 05:15 IST

नवीन शिक्षक नियुक्तीवरील बंदीविरुद्ध गोंदिया शिक्षण संस्थेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. ही बंदी अवैध असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे.

नागपूर : नवीन शिक्षक नियुक्तीवरील बंदीविरुद्ध गोंदिया शिक्षण संस्थेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. ही बंदी अवैध असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला नोटीस बजावून यावर २७ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.प्रकरणावर न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व अरुण उपाध्ये यांच्यासमक्ष सुनावणी झाली. संस्थेची १३ अनुदानित महाविद्यालये कार्यरत असून त्यात शिक्षकांची ३८० पदे मान्यताप्राप्त आहेत. त्यापैकी ११० पदे २०१३ पासून रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षणावर वाईट परिणाम होत आहे. ११ मे २०१७ रोजी शिक्षण सहसंचालकांनी ३१ पदे भरण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार जाहिरात देऊन १० जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या व त्यातून पात्र उमेदवारांची निवड करण्यात आली. दरम्यान, २५ मे २०१७ रोजी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च नियंत्रित करण्यासाठी ३० टक्के पदे कपातीचा निर्णय जारी केला. तसेच, नवीन नियुक्त्यांवर बंदी आणली. हा निर्णय शिक्षण क्षेत्रासाठी धोकादायक असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.शिक्षकांची पदे विद्यार्थी संख्या व यूजीसीच्या नियमानुसार ठरतात. सरकार स्वत:च्या मर्जीने शिक्षकांची पदे निश्चित करू शकत नाही. दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे सरकारचे कर्तव्य आहे. त्यामुळे वेतनावरील खर्च कमी करण्याची बाब शिक्षणाला लागू होऊ शकत नाही असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.