शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

३० ते ४५ वर्षाचा नवा वयोगट, १० हजार नागरिकांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST

नागपूर : राज्य शासनाच्या निर्देशानुसार नागपुरात शनिवारी ३० ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. ऑनलाईन ...

नागपूर : राज्य शासनाच्या निर्देशानुसार नागपुरात शनिवारी ३० ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. ऑनलाईन नोंदणी आवश्यक असलेल्या या लसीकरणाला नागरिकांनी प्रतिसाद दिला. विविध स्लॉटमध्ये शहरातील १०५ केंद्रावरून सुमारे १० हजार नागरिकांनी लसीचा डोस घेतला.

३० ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी मनपा प्रशासनाने आधीच नियोजन केलेले होते. त्यानुसार १०५ केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस घेण्यासाठी या वयोगटासाठी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक होती. शुक्रवारी रात्री ८.३० वाजेपासून कोव्हिन ॲपवर ऑनलाईन नोंदणीला प्रारंभ झाला. अवघ्या काही वेळातच संपूर्ण सत्रातील नोंदणी बुक झाली. काही केंद्रांवर २०० तर काही केंद्रांवर १०० डोस उपलब्ध करण्यात आले होते. नियोजनामुळे केंद्रावर अतिरिक्त गर्दी आढळून आली नाही.

१८ ते ४४ वर्ष वयोगटातील लसीकरण सुरू करण्यासंदर्भात शुक्रवारी महापौर दयाशंकर तिवारी व आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. शुक्रवारी शासनाचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर नियोजनानुसार शनिवारपासून लसीकरणाला प्रारंभ झाला. राधाकृष्णन बी. आणि अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी डिक दवाखाना लसीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली.

...

४५ वर्षावरील नागरिकांचेही लसीकरण

सर्व १०५ केंद्रावरून ३० ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांसोबतच ४५ वर्षांवरील नागरिकांचेही लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली. शिवाय ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’अंतर्गत सुद्धा ३० ते ४४ आणि ४५ वर्षावरील अशा दोन्ही वयोगटातील नागरिकांना लस दिली जात आहे.

...

तीन केंद्रांवर कोव्हॅक्सीन

४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सिन पहिला व दुसरा डोस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज), बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, सिद्धार्थ नगर, आशीनगर झोनच्या मागे (डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय) व स्व. प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केंद्र येथे उपलब्ध आहे. तसेच ज्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे त्यांना दुसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज) व स्व. प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केंद्र येथे देण्याची व्यवस्था केली आहे. यासाठी त्यांना ऑनलाईन नोंदणीचा पर्याय उपलब्ध आहे.

....