शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा रक्षकांचा कामात हलगर्जीपणा

By admin | Updated: December 18, 2014 02:39 IST

पी.एफ.ची रक्कम वेळेवर देण्यात येत नाही, स्लिप देण्यात येत नाही असे आरोप ब्लॅक कॅट सेक्युरिटी टास्क अ‍ॅन्ड अलाईड सर्व्हिसेसच्या सुरक्षा रक्षकांनी केला होता.

नागपूर : पी.एफ.ची रक्कम वेळेवर देण्यात येत नाही, स्लिप देण्यात येत नाही असे आरोप ब्लॅक कॅट सेक्युरिटी टास्क अ‍ॅन्ड अलाईड सर्व्हिसेसच्या सुरक्षा रक्षकांनी केला होता. त्यावर व्यवस्थापकाने हे आरोप फेटाळत सुरक्षा रक्षक कामात हलगर्जीपणा करीत असल्याचे पुरावे सादर केले.ब्लॅक कॅट सेक्युरिटीतील काही सुरक्षा रक्षकांनी हिवाळी अधिवेशनानिमित्त रोजंदारी मजदूर सेनेच्या वतीने धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यात त्यांनी मासिक वेतन वेळेवर देण्यात येत नाही, पी.एफ.ची रक्कम वेळेवर जमा करण्यात येत नाही, सुरक्षेची साधने पुरविली जात नाही आदी आरोप या ब्लॅक सेक्युरिटीवर केले. त्याबाबत सेक्युरिटीचे व्यवस्थापक संजीवकुमार अग्रवाल यांनी पी.एफ.ची रक्कम आॅनलाईन जमा करण्यात येत असल्याचे पुरावे सादर केले. सुरक्षा रक्षकांना वेळेवर पगार देण्यात येतो. बोनससुद्धा त्यांनी केलेल्या कामानुसार देण्यात येतो. आमच्याकडून सुरक्षेची साधने सुरक्षा रक्षकांना दिली जातात. मोफत युनिफॉर्म, काठी, टॉर्च आदी पुरविले जातात. यापेक्षा आम्ही आणखी काय द्यावे, असा प्रश्न अग्रवाल यांनी उपस्थित केला. काही सुरक्षा रक्षकांनी काही दिवसांपूर्वी रोजंदारी मजदूर सेनेचे सदस्यत्व घेतले. तेव्हापासून ते कामात हलगर्जीपणा करीत आहेत. अमित भगत हा कर्तव्यावर असताना १३ डिसेंबर रोजी कामाच्या ठिकाणी झोपत होता. मोहन टापरे याने कारची चावी आणून तो त्यात झोपला होता. राहुल बागडे हा सुद्धा कामात कुचराई करीत असल्याचे आढळले. त्याबाबतचे आपल्याकडे पुरावे म्हणून छायाचित्र आहे, असे अग्रवाल यांनी सांगितले. (प्रतिनिधी)