शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

अट्टल चाेरटे पाेलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:10 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : दराेडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच अट्टल चाेरट्यांना कामठी (जुनी) पाेलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून, कार, ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : दराेडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच अट्टल चाेरट्यांना कामठी (जुनी) पाेलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून, कार, शस्त्र आणि दराेड्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण १ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई खैरी (वारेगाव) शिवारात शुक्रवारी (दि. १२) मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास करण्यात आली.

आकाश उर्फ चिपळ्या उर्फ मामा प्रमोद बागडे (३२, रा. जयभीमनगर, कामठी), विनोद रसिका वाघ (२९, रा.रामगड, कामठी), सचिन देवानंद कुमरे (२६, रा.जुनी कामठी, ता.पारशिवनी), शाहीद अली गुलाम अली (२८, रा.बिबी कॉलनी, न्यू येरखेडा, ता. कामठी) व नीरज उर्फ लक्की राजू पिल्ले (३०, रा.शास्त्री मंच, कादरझेंडा, कामठी) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. कामठी (जुनी) पाेलिसांचे पथक शुक्रवारी मध्यरात्री कामठी तालुक्यातील खैरी (वारेगाव) शिवारात गस्तीवर हाेते.

त्यांना या शिवारात एमएच-३१/एएच-०१९९ क्रमांकाची संशयास्पद स्थितीत आढळून आली. त्यामुळे त्यांनी ती कार थांबवून कारमधील पाचही जणांची चाैकशी केली आणि कारची झडती घेतली. पाेलिसांना कारमध्ये तलवार, लोखंडी रॉड, चाकू, मिरची पावडर, नायलॉन दोरी आदी साहित्य आढळून आल्याने त्यांनी पाचही जणांना ताब्यात घेतले. शेवटी त्यांनी आपण दराेडा टाकण्यासाठी या भागात फिरत असल्याची माहिती दिल्याने पाेलिसांनी त्यांना अटक केली आणि त्यांच्याकडून कारसह संपूर्ण साहित्य जप्त केले.

या आराेपींकडून एकूण १ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार विजय मालचे यांनी दिली. त्यांच्याकडून चाेरीच्या इतर घटना उघड हाेण्याची शक्यताही विजय मालचे यांनी व्यक्त केली. या प्रकरणी कामठी पाेलिसांनी भादंवि ३९९ तसेच भारतीय शस्त्र प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. ही कारवाई सहायक फाैजदार तंगराज पिल्ले, महेश कठाणे, पंकज मारसिंगे, गयाप्रसाद वर्मा, शंकर हंबर्डे, रूपेश दीक्षित, विशाल उपटकर यांच्या पथकाने केली.