शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

नरखेडमध्ये तणावाचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 01:54 IST

‘व्हॉटस्अप’ या ‘सोशल मीडिया’वर सुरू असलेल्या चर्चेतून वाद उद्भवून त्याचे पर्यवसान डॉक्टरला बेदम मारहाण करण्यात झाले.

ठळक मुद्देडॉक्टरला बेदम मारहाण : सोशल मीडियावरील चर्चेतून उद्भवला वाद

लोकमत न्यूज नेटवर्कनरखेड : ‘व्हॉटस्अप’ या ‘सोशल मीडिया’वर सुरू असलेल्या चर्चेतून वाद उद्भवून त्याचे पर्यवसान डॉक्टरला बेदम मारहाण करण्यात झाले. सोबतच चर्चेत डॉक्टरची बाजू उचलून धरणाºयाच्या घरावर हल्ला करण्यात आला. हा प्रकार गुरुवारी (दि. ३) दुपारच्या सुमारास नरखेडमध्ये झाला. यामुळे नरखेडमध्ये तणाव निर्माण होऊन अतिरिक्त पोलीस कुमक तैनात करण्यात आली. वृत्त लिहिस्तो आरोपींना अटक करण्याचे सत्र सुरू होते.डॉ. सुभाष ज्ञानेवर वाघे, रा. नरखेड असे जखमीचे नाव आहे. ‘व्हॉटसअप’वर एका ग्रुपमध्ये देशभक्ती या विषयाला धरून बुधवारी रात्री चर्चा सुरू होती. त्यात दोन गटाचे नागरिक सहभागी होते. दोघेही आरोप - प्रत्यारोप करू लागले. त्यातून वाद उद्भवला. त्यामुळे एका समुदायाच्या १०० ते १५० नागरिकांनी गुरुवारी दुपारी १.४५ वाजताच्या सुमारास सावरगाव बसस्टँडजवळील डॉ. वाघे यांच्या क्लिनिकवर हल्ला चढविला. तेथील साहित्याची नासधूस करीत डॉ. वाघे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी मारत - मारत अर्ध्या किमी अंतरापर्यंत गुरमुळे ले-आऊटपर्यंत आणले. तेथे रामेश्वर शेंदरे यांच्या घरावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्या ग्रुपवरील चर्चेत लष्करामध्ये असलेला रामेश्वरचा लहान भाऊसुद्धा सहभागी होऊन डॉ. वाघे यांची बाजू घेतली होती. त्यामुळे हल्ला चढविण्याच्या विचारात समुदाय होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. थोड्याच वेळात ही माहिती शहरात पसरताच दोन्ही गटाने पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली.याबाबत पोलीस निरीक्षक दिलीप मसराम यांनी लगेच कंट्रोल रुमला माहिती देताच अतिरिक्त पोलीस दल तैनात झाला. अप्पर पोलीस अधीक्षक नरसिंग शेरखाने, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, कामठीचे ईश्वर कातकडे हेसुद्धा नरखेडमध्ये पोहोचले. त्यानंतर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे हेसुद्धा नरखेडमध्ये दाखल झाले. ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.या प्रकरणी डॉ. वाघे यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम १४३, १४७, १४९, ३२६, ३४२, २९४, ५०६, ४२७ अन्वये गुन्हा दाखल केला. तर रामेश्वर शेंदरे यांच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम ४५२, १४३, १४७, १४९, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. वृत्त लिहिस्तोवर तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते.आज नरखेड बंदनरखेड येथील डॉ. सुभाष वाघे यांना मारहाण, शेंदरे यांच्या घरावर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि. ४) नरखेड बंदचे आवाहन व्यापारी संघटनेसह सर्वपक्षीयांनी घेतला आहे. सर्वच आरोपींना उद्यापर्यंत अटक न झाल्यास नरखेडमधील वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे. सध्या शहरात कडेकोट बंदोबस्त असून शांततापूर्ण तणाव आहे. या घटनेबाबत सोशल मीडियावरूनच पुन्हा वातावरणनिर्मिती केली जात आहे, हे विशेष!