शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

नागपुरात नीरीने साकारला वेस्ट मॅनेजमेंट पार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 01:25 IST

काचेच्या बॉटल्स किंवा वस्तू निसर्गातून नष्ट व्हायला एक लाख वर्ष लागतात. प्लास्टिक बॉटल्स किंवा पिशव्या ४५० पेक्षा जास्त वर्षपर्यंत नष्ट होऊ शकत नाही. तीच अवस्था खाद्यपदार्थ किंवा गुटखा, तंबाखूच्या पाऊचची आहे. थर्माकोलच्या वस्तू नष्ट व्हायला ५० पेक्षा जास्त वर्ष लागतात. रुग्णालयातून निघणारा कचराही तसाच धोकादायक आहे. हा सर्व कचरा एकाच प्रकारचा आहे असे गृहीत धरून एकाच कचरा कुंडीत जमा करताना आपण कधी या गोष्टीचा विचार केला आहे का? आतापर्यंत नसेल केला, पण यानंतर करावाच लागणार आहे. याबाबत अभ्यासपूर्ण व पर्यावरणाबाबत संवेदनशील मार्गदर्शन करणारा ‘वेस्ट मॅनेजमेंट पार्क’ नीरी व स्वच्छ असोसिएशन या एनजीओने साकारला आहे.

ठळक मुद्देकचरा व्यवस्थापनाचे प्रभावी मार्गदर्शन : विद्यार्थी, नागरिकांसाठी अभ्यासपूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काचेच्या बॉटल्स किंवा वस्तू निसर्गातून नष्ट व्हायला एक लाख वर्ष लागतात. प्लास्टिक बॉटल्स किंवा पिशव्या ४५० पेक्षा जास्त वर्षपर्यंत नष्ट होऊ शकत नाही. तीच अवस्था खाद्यपदार्थ किंवा गुटखा, तंबाखूच्या पाऊचची आहे. थर्माकोलच्या वस्तू नष्ट व्हायला ५० पेक्षा जास्त वर्ष लागतात. रुग्णालयातून निघणारा कचराही तसाच धोकादायक आहे. हा सर्व कचरा एकाच प्रकारचा आहे असे गृहीत धरून एकाच कचरा कुंडीत जमा करताना आपण कधी या गोष्टीचा विचार केला आहे का? आतापर्यंत नसेल केला, पण यानंतर करावाच लागणार आहे. याबाबत अभ्यासपूर्ण व पर्यावरणाबाबत संवेदनशील मार्गदर्शन करणारा ‘वेस्ट मॅनेजमेंट पार्क’ नीरी व स्वच्छ असोसिएशन या एनजीओने साकारला आहे.राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी)च्या ६१ व्या स्थापना दिनानिमित्त हा पार्क नागरिक व विद्यार्थ्यांसाठी खुला करण्यात आला आहे. स्वच्छ असोसिएशनच्या सहकार्याने पार्क ची निर्मिती करण्यात आली आहे. आपल्या घरातून, रुग्णालये, उद्योग, कंपन्या किंवा संस्थांच्या कार्यालयातून निघणाऱ्या सर्व प्रकारच्या कचऱ्याचे वर्गीकरण, व्यवस्थापन व पुनर्वापराचे सविस्तर मार्गदर्शन या पार्कमध्ये मिळते. नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार यांच्या मार्गदर्शनात हा पार्क साकार झाला. उपक्रमाच्या प्रमुख डॉ. अत्या कपले, स्वच्छच्या अनसूया काळे-छाबरानी व शेफाली दुधबडे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.खरंतर घरगुती कामात आवश्यक नसल्यास प्लास्टिक किंवा तत्सम धोकादायक वस्तूंना नकारच देणे गरजेचे आहे. मात्र विविध वस्तूंचा पुरवठा प्लास्टिकच्या साहित्यामध्येच होत असल्याने ते गरजेचे ठरते. पण या साहित्याचा शक्यतो पुनर्वापर करणे शक्य असल्यास तो करावा. ते शक्य नसेल तर घरगुती केरकचºयामध्ये त्याला मिक्स करू नये. प्लास्टिक, धातूचे व काचेचे साहित्य, सॅनिटरी नॅपकीन, इलेक्ट्रानिक्स उपकरणे, घरातील वैद्यकीय कचरा यासाठी स्वतंत्र डस्टबीन असणे नितांत गरजेचे आहे. कारण हा कचरा अत्यंत धोकादायक असून तो एकत्रितपणे गेल्यास त्याचे वर्गीकरण व नंतर रिसायकलिंग करणे गुंतागुंतीचे ठरते. टाकाऊ अन्नपदार्थ, भाजीपाला, पानेफुले या गोष्टींपासून कंपोस्ट करणे शक्य आहे व पर्यावरणास लाभदायक आहे. खर्डे, पेपर वेस्ट, फळांचे छिलके या गोष्टी लवकर नष्ट करता येतात. पण प्लास्टिक, काच, धातूंच्या वस्तू, तार, मुलांचे डायपर, सॅनिटरी नॅपकीन, केस, औषधांचा कचरा नष्ट करणे शक्य नाही.यात इ-कचऱ्याच्या राक्षसाची आणखी भर पडली आहे. या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन देणारे मॉडेल्स पार्कमध्ये आहेत. पृथ्वी गिळंकृत केलेला प्लास्टिकचा कचरा, सोबत धातूंचा कचरा, इलेक्ट्रानिक्स साहित्याचा कचरा, वैद्यकीय कचरा पर्यावरणास किती भीषण हानी पोहचवू शकतो, याचे दर्शन मॉडेल्सच्या माध्यमातून घडविण्यात आले आहे. केवळ दुष्परिणामच नाही तर या कचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन कसे करू शकतो, याचे मॉडेल्ससह मार्गदर्शन करवून देण्यात आले आहे.ओला कचरा, सुका कचरा आणि धोकादायक कचरा याचे वर्गीकरण करून वेगवेगळ्या डस्टबीनमध्ये गोळा केल्यास आपण पर्यावरण व देशाचीही सेवा करू शकतो. केवळ शासकीय यंत्रणांवर अवलंबून न राहता आपलीही काही जबाबदारी आहे, याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करून देण्यात आला आहे. आपल्या छोट्या छोट्या चुका टाळल्या तर आपण पर्यावरण संवर्धनात हातभार लावू शकतो, हे समजून घेण्यासाठी विद्यार्थी व नागरिकांनीही नीरीच्या गेट नं. २ जवळील या वेस्ट मॅनेजमेंट पार्कला भेट द्यावी.नाना मिसाळ यांची कलात्मकताया पार्कमध्ये आणखी एक गोष्ट लक्ष वेधून घेते ती चित्रकार नाना मिसाळ यांची कलात्मकता. नीरी व स्वच्छच्या सहयोगाने त्यांनी निरुपयोगी व टाकाऊ असलेल्या साहित्यापासून सुंदर अशी कलाकृती साकार केली आहे. फुटलेले सीमेंटचे पाईप्स, लाकडाचे तुकडे, फरशा आणि फुटलेल्या टाईल्सना कलात्मक आकार देऊन सजविले आहे. लोकडांच्या ओंडक्यांना प्राण्यांचा सुबक आकार दिला आहे. शिवाय इलेक्ट्रानिक्स, मेडिकल वेस्ट, बांधकाम साहित्य, प्लास्टिक कचरा दर्शविणारे मॉडेल्स तयार करण्यात अनसूया काळे, शेफाली दुधबडे यांच्यासह त्यांनी योगदान दिले आहे.

टॅग्स :scienceविज्ञानtechnologyतंत्रज्ञान