शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

देशामध्ये ‘स्मार्ट’ गावांची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:31 IST

देशातील बहुतांश जनता गावात राहते. देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी शहरांना ‘स्मार्ट’ करण्यासोबतच गावांचादेखील विकास झाला पाहिजे.

ठळक मुद्देनितीन गडकरी : ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ कृषी प्रदर्शनाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील बहुतांश जनता गावात राहते. देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी शहरांना ‘स्मार्ट’ करण्यासोबतच गावांचादेखील विकास झाला पाहिजे. ‘स्मार्ट’ गावांची आवश्यकता असून यामुळे गावातून होणारे स्थलांतरण थांबू शकते, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. सोमवारी ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ प्रदर्शनाचा समारोप झाला. याप्रसंगी ते बोलत होते.रेशीमबाग मैदानात आयोजित या कार्यक्रमाला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, हरयाणाचे कृषिमंत्री ओमप्रकाश धनकड, मध्य प्रदेशचे कृषिमंत्री गौरीशंकर बिसेन, खा.अजय संचेती, खा.रामदास तडस प्रामुख्याने उपस्थित होते. विदर्भातील शेतकºयांमध्ये आत्मविश्वास जागविणे आवश्यक आहे. शेतकºयांना प्रगतीसाठी पीक घेण्याची पद्धती बदलणे गरजेचे आहे. शिवाय मालाला जिथे मागणी आहे, अशी बाजारपेठदेखील शोधण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे गडकरी म्हणाले.चीनमध्ये बांबू लागवड व त्याआधारित उद्योगांमुळे ५० लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. विदर्भातील शेतकरी शेतीच्या धुºयावर बांबूचे उत्पादन करू शकतात. बांबूवरील ‘टीपी’ (ट्रांजिट पास) काढण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून यामुळे बाबूंची लागवड व वाहतूक करणे सुलभ झाले आहे. बांबूला भाव न मिळाल्यास त्याला उसाप्रमाणे भाव देण्याची शासनाची तयारी आहे. केंद्र शासनाने झुडपी जंगले व चराईच्या जागा यांना वनजमिनी ऐवजी राजस्व जमिनी म्हणून मान्यता दिल्यामुळे लाखो हेक्टर जागा उपलब्ध झाली आहे. या जागेवर बांबू लागवड केल्यास पर्यावरणाचे रक्षण होऊन लाखो लोकांना रोजगार निर्माण होईल, असे प्रतिपादन यावेळी गडकरी यांनी केले. यावेळी मंचावर आ.नाना शामकुळे, सुलेखा कुंभारे, पाशा पटेल,डॉ.सी.डी.मायी, आयोजन समितीचे संयोजक गिरीश गांधी, सचिव रवी बोरटकर, रमेश मानकर प्रामुख्याने उपस्थित होते. रवी बोरटकर यांनी प्रास्ताविक केले. रेणुका देशकर यांनी संचालन केले.चंद्रपुरात लवकरच ‘युरिया’ प्रकल्पहंसराज अहिर यांनी ‘अ‍ॅग्रोव्हिजन’सारखे उपक्रम शेतकºयांसाठी लाभदायक व दिशादर्शक असल्याचे मत व्यक्त केले. चंद्रपूरमध्ये ‘युरियाचा प्रकल्प’ स्थापन करण्यासाठी राज्य शासनाने जमीन उपलब्ध करून दिली असून लवकरच त्याचे भूमिपूजन होईल, असे त्यांनी सांगितले.गावांमध्ये यंत्रसामग्रींची बँक हवीशेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असून त्यांची किंमत लक्षात घेता एका शेतकºयाला ते परवडण्यासारखे नाही. त्यामुळे गावातील शेतजमिनीपर्यंत जर तंत्रज्ञान पोहोचवायचे असेल तर गावागावांमध्ये यंत्रसामग्रींची ‘बँक’ बनविण्याची आवश्यकता आहे. यासाठी खासदार, आमदार व जनप्रतिनिधींनी पुढाकार घेतला पाहिजे. शेतकरी, सरकारी योजना इत्यादींच्या माध्यमातून निधी उभारून हे तंत्रज्ञान गरजूंना आवश्यक ते शुल्क घेऊन उपलब्ध करुन दिले पाहिजे, असा सल्ला गडकरींनी यावेळी दिला.गंगानदीच्या काठावर १० कोटी वृक्ष लावणारवनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात चार कोटी वृक्षारोपण करून एक नवा पुढाकार घेतला. गंगानदीच्या काठावरदेखील वृक्षारोपण करण्याचा केंद्राचा विचार आहे. हरिद्वार ते कोलकाता यादरम्यान गंगानदीच्या काठावर १० कोटी वृक्ष लावण्यात येतील. यासाठी सुधीर मुनगंट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी यावेळी दिली.