शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्थानकावर हवी एसी दुरुस्त करण्याची यंत्रणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2016 03:23 IST

एसीमध्ये बिघाड झाल्यास संबंधित एसी कोचमध्ये बसणे प्रवाशांना कठीण होते. त्यांचा जीव गुदमरतो.

प्रवाशांची गैरसोय : नेहमीच होतो गोंधळनागपूर : एसीमध्ये बिघाड झाल्यास संबंधित एसी कोचमध्ये बसणे प्रवाशांना कठीण होते. त्यांचा जीव गुदमरतो. नागपूर रेल्वेस्थानकावर नेहमीच एसीमध्ये बिघाड झाल्यामुळे प्रवासी गोंधळ घालतात. परंतु तरीसुद्धा एसीतील बिघाड दुरुस्त करण्यासाठी रेल्वेस्थानकावर यंत्रणा उपलब्ध करून न दिल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकावर एसीतील बिघाड दुरुस्त करणारे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.सोमवारी सायंकाळी रेल्वेगाडी क्रमांक १२५१२ राप्तीसागर एक्स्प्रेसच्या बी २ कोचचा एसी नादुरुस्त झाल्यामुळे प्रवाशांनी एकच गोंधळ घालून ही गाडी एक तास रोखून धरली. एसी दुरुस्त झाल्याशिवाय गाडी पुढे जाऊ देणार नसल्याची भूमिका घेऊन तब्बल १२ वेळा चेन पुलिंग केले. अखेर एसी दुरुस्त करणारे कर्मचारी या गाडीसोबत रवाना करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेऊन ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना केली. एखाद्या कोचमधील एसी नादुरुस्त झाल्यास त्या कोचमधील प्रवाशांना गुदमरल्यासारखे वाटते. एसी कोचचे काच बंद असल्यामुळे हवा आत येण्यास काहीच पर्याय नसतो. याशिवाय एसीसाठी अधिक पैसे मोजून ती सुविधा न मिळाल्यास प्रवाशांचा संताप होतो. नागपूर रेल्वेस्थानकावर एसी बंद झाल्यामुळे प्रवाशांनी गोंधळ घातल्याच्या घटना नेहमीच घडतात. परंतु तरीसुद्धा एसी दुरुस्त करणारे तांत्रिक कर्मचारी येथे उपलब्ध करून देण्यात येत नाहीत. अनेकदा प्रवाशांना पुढील रेल्वेस्थानकावर एसी दुरुस्त करून देऊ असे आश्वासन देऊन त्यांची बोळवण करण्यात येते. नागपूर रेल्वेस्थानकावरून दररोज ११० ते १२५ रेल्वेगाड्या ये-जा करतात. त्यामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एसीतील बिघाड दुरुस्त करणारी यंत्रणा रेल्वेस्थानकावर उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.(प्रतिनिधी)सुरक्षा यंत्रणेची तारांबळएसी नादुरुस्त झाल्यानंतर प्रवासी चेनपुलिंग करून रेल्वेगाडी रोखून धरतात. यामुळे रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना कसरत करून प्रवाशांची समजूत काढावी लागते. अनेकदा प्रवासी आक्रमक झाल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अशा घटना टाळण्यासाठी रेल्वेस्थानकावर यंत्रणा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.