शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

विकासाकरिता प्रक्रिया उद्योगांची गरज

By admin | Updated: November 26, 2014 01:03 IST

राज्याच्या विकासासाठी आखलेल्या ‘व्हिजन महाराष्ट्र’चा आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी संक्षिप्तपणे मांडला. लोकमत वृत्तपत्रसमूहाचे संस्थापक संपादक, स्वातंत्र्यसेनानी श्रद्धेय

देवेंद्र फडणवीस : ‘व्हिजन महाराष्ट्र’ संकल्पनेचा मांडला आराखडा यवतमाळ : राज्याच्या विकासासाठी आखलेल्या ‘व्हिजन महाराष्ट्र’चा आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी संक्षिप्तपणे मांडला. लोकमत वृत्तपत्रसमूहाचे संस्थापक संपादक, स्वातंत्र्यसेनानी श्रद्धेय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या १७ व्या स्मृतिदिनी ‘प्रेरणास्थळ’ येथे ‘व्हिजन महाराष्ट्र’अंतर्गत मुख्यमंत्र्यांनी उद्योग, विदर्भाचा विकास, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, कापूस, सिंचन आणि दुष्काळासोबतच अनेक मुद्दे उपस्थित केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन, खासदार विजय दर्डा हे होते. राज्याचे माजी शिक्षणमंत्री तसेच लोकमत वृत्तपत्र समूहाचे ‘एडिटर इन चीफ’ राजेंद्र दर्डा हे देखील प्रामुख्याने उपस्थित होते.पंचनाम्याची अट रद्द होणारराज्यातील १९ हजार गावांमध्ये दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. मदतीसाठी व्यक्तिगत पंचनाम्याची अट या गावांतील शेतकऱ्यांना अडचणीची ठरत आहे. व्यक्तिगत पंचनाम्यामुळे मदत मिळण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागतो. या अटीला शिथिल करण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे. केंद्र सरकारची याबाबतीत सकारात्मक भूमिका आहे. परंतु काही तांत्रिक मुद्दे सोडविणे बाकी आहे. त्यानंतर तत्काळ व्यक्तिगत पंचनाम्याची अट रद्द करण्याचे आदेश जारी करण्यात येतील, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.राज्यामध्ये मोठे उद्योग न येण्याचे कारण म्हणजे उद्योगांसाठी अनुकूल वातावरण नसणे. एक कारखाना लावण्यासाठी उद्योजकांना ७६ निरनिराळ्या विभागांकडून परवानगी मिळवावी लागते. त्यामुळे ते येथे येण्यासाठी उत्सुक नाहीत. यावर तोडगा काढण्यासाठी समिती बनविण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.