शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
3
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
4
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
5
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
6
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
7
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
8
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
9
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
10
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
11
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
12
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
13
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
14
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
15
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
16
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
17
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
18
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
19
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
20
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण

स्वातंत्र्य टिकविण्यासाठी लढा देण्याची गरज

By admin | Updated: March 8, 2015 02:35 IST

वैदर्भीय महिलांनी स्वातंत्र्य लढ्यात हिरीरीने सहभाग घेऊन स्वातंत्र्य मिळवून दिले. परंतु स्वातंत्र्याचा लढा येथेच संपत नसून मिळालेले स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी ....

नागपूर : वैदर्भीय महिलांनी स्वातंत्र्य लढ्यात हिरीरीने सहभाग घेऊन स्वातंत्र्य मिळवून दिले. परंतु स्वातंत्र्याचा लढा येथेच संपत नसून मिळालेले स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी पुन्हा विदर्भातील महिलांनी हातात हात घालून लढा देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रसेविका समितीच्या माजी प्रमुख संचालक प्रमिलाताई मेढे यांनी केले.माधवनगरच्या माधवराव गोळवलकर सभागृहात डॉ. दमयंती पाठक यांच्या वैदर्भीय महिलांचा स्वातंत्र्य संग्रामातील सहभाग या पुस्तकाच्या हिंदी आणि इंग्रजी अनुवादाच्या प्रकाशन समारंभात त्या अध्यक्षस्थानाहून बोलत होत्या. व्यासपीठावर ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी लीलाताई चितळे, लेखिका डॉ. दमयंती पाठक, मार्गदर्शिका डॉ. शांता कोठेकर उपस्थित होत्या. प्रमिलाताई मेढे म्हणाल्या, विदर्भ ही तेजस्वी कन्यांची भूमी आहे. इतिहासातील अप्रकट माहिती दमयंती पाठक यांनी पुस्तकाच्या रूपाने प्रकाशात आणली आहे. त्यांच्या हातून असेच अखंड काम घडण्यासाठी त्यांना उदंड आयुष्य लाभावे, अशी शुभेच्छा त्यांनी दिली. लीलाताई चितळे म्हणाल्या, विदर्भातील महिलांनी स्वातंत्र्य लढ्यात दिलेल्या योगदानाच्या ऐकीव माहितीपेक्षा पुस्तक रूपाने माहिती मांडल्यामुळे हा महत्त्वाचा लेखी पुरावा ठरणार आहे. पुस्तकाचे हिंदी आणि इंग्रजीत भाषांतर झाल्यामुळे महाराष्ट्राबाहेर वैदर्भीय महिलांचा इतिहास जाणार आहे. वैदर्भीय महिलांनी स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिल्यामुळे आज महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करीत असल्याचे त्या म्हणाल्या. लेखिका दमयंती पाठक यांनी आपल्या मनोगतातून पुस्तक लिहिताना आलेल्या अनुभवाची माहिती दिली. डॉ. अलका भेदी यांनी दमयंती पाठकसारखी बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची आई लाभणे अभिमानाची गोष्ट असल्याचे मत व्यक्त केले. मार्गदर्शिका डॉ. शांता कोठेकर यांनी पुस्तक लिहिण्यासाठी दमयंती पाठक यांना गावोगावी फिरून मुलाखती घ्याव्या लागल्याचे सांगून, त्यांच्यातील उत्साहामुळेच ही बाब शक्य झाल्याची माहिती दिली. व्यासपीठार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाच्या हिंदी आणि इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन करण्यात आले. मंगेश प्रकाशनचे प्रसन्न मुजुमदार यांचा यावेळी सत्कार करण्यता आला. संचालन अनुराधा जोशी, प्राजक्ता टांकसाळे यांनी केले. आभार लता दाते यांनी मानले. कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)