शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अपंगांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज

By admin | Updated: August 26, 2014 01:03 IST

समाजातील अपंग व्यक्तींकडे दुर्लक्ष केले जाते. प्रसंगी त्यांना चांगली वागणूक दिली जात नाही. व्यक्ती अपंग असली तरी ती समाजाचा एक घटक आहे. या घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे,

अनिल देशमुख : कृत्रिम अवयव व साहित्य वाटप कार्यक्रमकाटोल : समाजातील अपंग व्यक्तींकडे दुर्लक्ष केले जाते. प्रसंगी त्यांना चांगली वागणूक दिली जात नाही. व्यक्ती अपंग असली तरी ती समाजाचा एक घटक आहे. या घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी केले.वसंतराव देशमुख देशमुख प्रतिष्ठान, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम कानपूर व नागपूर जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने काटोल येथे कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी देशमुख यांच्या हस्ते काटोल विधानसभा मतदारसंघातील अपंगांना कृत्रिम अवयव व साधानांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी बोलताना ते म्हणाले, शासनाच्यावतीने अपंगांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविल्या जातात. मंत्रिपदाच्या कार्यकाळात आपण काटोल विधानसभा मतदारसंघातील गरजूंपर्यंत शासकीय व निमशासकीय योजना पोहोचविल्या आहेत. या योजनांचा वेळीच लाभ मिळाल्याने अनेक गरजवंतांना मोठी मदत झाली आहे. या योजनांचा लाभ मिळाल्यानंतर अनेकांचे जीवन सुखकर झाले आहे. आज या मतदारसंघातील शेकडो गरजू अपंगांचे जीवन सुखकर होणार आहे. त्यांना मोफत कृत्रिम अवयवांचे व साहित्याचे वाटप आपल्या हस्ते होत असल्याने हा आपल्या जीवनातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण असल्याचेही त्यांनी सांगितले. या योजनेंतर्गत नरखेड व काटोल तालुक्यातील सर्व प्रवर्गातील व वयोगटातील अपंग व्यक्तींचा शोध घेण्यात आला. ८ फेबु्रवारी २०१४ रोजी नरखेड व १० फेब्रुवारी २०१४ रोजी काटोल येथे शिबिराचे आयोजन करून या अपंगांच्या अवयवाचे मोजमाप घेण्यात आले. या मोजमाप शिबिरात नरखेड व काटोल तालुक्यातील अस्थिव्यंग, मतिमंद, सेरेब्रल पाल्सी, बहुविकलांग, कर्णबधिर, अंशत: अंध, अंध या प्रवर्गातील एकूण ९५३ अपंग व्यक्तींचे त्यांच्या गरजेनुसार आवश्यक असणारे कृत्रिम अवयव व साहित्य व साधने यांचे मोजमाप घेण्यात आले होते. या सर्व व्यक्तींना कृत्रिमम अवयव व साहित्याचे नुकतेच वितरण करण्यात आले. (प्रतिनिधी)