शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

डुकरे पकडण्यासाठी यापुढे एनडीएस करणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 00:34 IST

शहरातील डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी, त्यांना पकडण्यासाठी आलेल्या तामिळनाडूतील पथकावर मंगळवारी जरीपटक्यातील बँक कॉलनीमध्ये हल्ला झाला. यात सहा सदस्य जखमी झाले होते. ही घटना मनपाचे प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे आणि अपर आयुक्त राम जोशी यांनी गंभीरपणे घेतली आहे. त्यांनी बुधवारला एक बैठक घेऊन शहरातील कचरा, अतिक्रमणावर लक्ष ठेवणाऱ्या न्यूसेन्स डिटेक्शन स्क्वॉड(एनडीएस)मधील सदस्यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देसैन्यातील निवृत्त जवान झाले स्वच्छतादूत : पथकाला सुरक्षा प्रदान करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी, त्यांना पकडण्यासाठी आलेल्या तामिळनाडूतील पथकावर मंगळवारी जरीपटक्यातील बँक कॉलनीमध्ये हल्ला झाला. यात सहा सदस्य जखमी झाले होते. ही घटना मनपाचे प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे आणि अपर आयुक्त राम जोशी यांनी गंभीरपणे घेतली आहे. त्यांनी बुधवारला एक बैठक घेऊन शहरातील कचरा, अतिक्रमणावर लक्ष ठेवणाऱ्या न्यूसेन्स डिटेक्शन स्क्वॉड(एनडीएस)मधील सदस्यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.एनडीएसअंतर्गत कार्यरत असलेले सर्व स्वच्छतादूत सैन्यातील निवृत्त जवान असून, सैन्यामध्ये विविध पदांवर कार्य केलेले आहेत. अनेक जवानांना युद्धाचा आणि दंगलींवर नियंत्रण मिळविण्याचा अनुभवही आहे. हे लक्षात घेऊन रवींद्र ठाकरे यांनी पोलिसांसोबतच एनडीएस टीमची या मोहिमेच्या काळात मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. तामिळनाडूतील पथकाला ते सुरक्षा प्रदान करतील.एनडीएसचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात बुधवारी स्वच्छतादूतांची स्वतंत्र बैठक झाली. यात स्वच्छतादूतांना त्यांच्या जबाबदारीसंदर्भात जाणीव करून देण्यात आली. मोहिमेच्या काळात कुणी असामाजिक तत्त्व हल्ला करीत असतील तर त्यांच्यावर सैन्य कौशल्याचा उपयोग करून हा हल्ला परतवून लावण्याचे आदेशही देण्यात आले. मनपा प्रशासन आणि पोलिसांनी त्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.प्राप्त माहितीनुसार, ४६ स्वच्छतादूत तामिळनाडूच्या पथकासोबत दिवस-रात्र राहतील. रोज १०० डुकरे पकडण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. बेवारस डुकरांचा शहरात मोठ्या प्रमाणावर संचार वाढल्याने, हे पाऊल उचलण्यात आले आहे.महापौर कक्षापुढे वराहपालकांची गर्दीशहरात सुरू असलेल्या डुकरे पकडण्याच्या मोहिमेविरोधात बुधवारी वराहपालक मनपाच्या मुख्यालय पोहचले. त्यांनी महापौर नंदा जिचकार यांची भेट घेऊन आपली समस्या सांगितली. ही कारवाई तातडीने बंद करण्याची मागणी त्यांनी केली. याचदरम्यान उत्तर नागपुरातील भाजपाची काही नेतेमंडळीही ही कारवाई थांबविण्याच्या बाजूने दिसली. मात्र प्रशासनापासून तर पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचेच या मोहिमेला समर्थन असून, डुकरे पकडून शहराबाहेर सोडण्यावर ही मंडळी ठाम आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका