शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
4
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
5
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
6
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
7
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
8
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
9
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
10
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
11
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
12
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
13
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
14
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
15
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
16
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
17
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
18
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
19
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
20
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 

एनडीए २०० च्या पुढे जाणार नाही : प्रवीण चक्रवर्ती यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 20:52 IST

देशात कुठल्याही प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट दिसत नाही. २०१४ च्या तुलनेत जवळपास सर्वच राज्यात भाजपला व त्याच्या घटक पक्षांना फटका बसत आहे. एकूणच एनडीए देशात २०० च्या पुढे जाणार नाही, असा दावा काँग्रेसच्या ‘डाटा एनालिटिक्स डिपार्टमेंट’चे अध्यक्ष व शक्ती अ‍ॅपचे प्रमुख प्रवीण चक्रवर्ती यांनी केला.

ठळक मुद्देदक्षिण भारतात भाजप साफ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात कुठल्याही प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट दिसत नाही. २०१४ च्या तुलनेत जवळपास सर्वच राज्यात भाजपला व त्याच्या घटक पक्षांना फटका बसत आहे. एकूणच एनडीए देशात २०० च्या पुढे जाणार नाही, असा दावा काँग्रेसच्या ‘डाटा एनालिटिक्स डिपार्टमेंट’चे अध्यक्ष व शक्ती अ‍ॅपचे प्रमुख प्रवीण चक्रवर्ती यांनी केला.प्रवीण चक्रवर्ती व खा. कुमार केतकर यांनी रविवारी ‘लोकमत’ला भेट दिली. या वेळी ते बोलत होते. चक्रवर्ती म्हणाले, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या चार राज्यात एनडीएला ६० पेक्षा जास्त जागा मिळणार नाही. उत्तर प्रदेशातही गेल्या वेळच्या तुलनेत अर्ध्यापेक्षाही कमी जागा मिळतील. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू यासह संपूर्ण दक्षिण भारतात एनडीएला १० जागाही मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे ही एवढी मोठी तूट भरून काढण्यासाठी भाजपला दुसरी जागा नाही. याचा फटका निश्चितच एनडीएला बसेल, असा दावा त्यांनी केला.देशाचे एकूणच वातावरण पाहता दलित, मुस्लीम, अल्पसंख्याक समाज एकत्र येत आहेत. मतदार उघडपणे प्रतिक्रिया देणे टाळत आहे. मतदारांचे हे मौन बरेच सूचक असून ते निकाल पलटवूनच तुटेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.प्रियंका फॅक्टरचा फायदाकाँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांची एन्ट्री काँग्रेसला नवचैतन्य देणारी आहे. त्यांच्या प्रचाराचा उत्तर प्रदेशात काँग्रेसला नक्कीच फायदा होईल. जागा किती वाढतील, हे सांगणे कठीण आहे. मात्र, काँग्रेसच्या मतांची टक्केवारी नक्कीच वाढलेली असेल, असा दावाही चक्रावर्ती यांनी केला.शक्ती अ‍ॅप उपयोगीइच्छुक उमेदवार, नेते हे शक्ती अ‍ॅपच्या माध्यमातून आपल्या भागातील काँग्रेस समर्थकांची नोंदणी करीत आहेत. त्यामुळे तेवढ्या लोकांशी काँग्रेसचा थेट संपर्क होत आहे. काँग्रेसची ध्येयधोरणे पोहचत आहे. उमेदवारी ठरवितानाही शक्ती अ‍ॅपवरील फिडबॅकचा बऱ्या प्रमाणात उपयोग करून घेतला जात आहे. जेथे उमेदवारीवरून मतभेद असेल अशा जागांवर तर नक्कीच हे अ‍ॅप उपयोगी ठरत आहे, असेही चक्रावर्ती यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019