जलालखेडा : नरखेड तालुक्यात पेठे इस्माईलपूर, खडकी, चांदणीबर्डी गट ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी पूर्वी प्रफुल डांगरे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली आहे. येथे ग्रामपंचायत निवडणूक राष्ट्रवादीच्या माळोदे गट व युवा विकास आघाडी यांच्यात झाली. त्यामध्ये माळोदे गटाने नऊपैकी सहा जागेवर विजय मिळविला होता. युवा विकास आघाडी पॅनलला तीन जागेवर यश मिळाले होते. येथे सरपंचपद अनुसूचित जमाती या प्रवगार्साठी राखीव आहे. अनुसूचित जमातीचा एकही सदस्य नसल्याचे ग्रामपंचायतची धुरा उपसरपंच यांच्या हाती येणार आहे. उपसरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये पूर्वी डांगरे व नाना मानकर यांनी अर्ज भरला होता. यात डांगरे सहाविरुद्ध तीन मतांनी विजयी झाल्या. त्यामुळे राष्ट्रवादीने येथे सत्ता स्थापन केली. विजयी उमेदवाराचे ज्ञानेश्वर माळोदे, नारायण ठाकरे, राजेश पोटपिटे, सेवक माकोडे, नीलेश ढोरे, श्याम देशमुख, सदाशिव ठोंबरे, जनार्दन माकोडे, भाऊराव नाखले, जयपाल चौरे, नीतेश माळोदे, तुषार माळोदे, प्रतीक डांगरे यांनी अभिनंदन केले.
पेठ इस्माईलपूर ग्रा.पं.मध्ये राष्ट्रवादीची सरशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:09 IST