शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीवर डोळा ठेवून राष्ट्रवादीची जम्बो कार्यकारिणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:07 IST

नागपूर : महापालिकेच्या आगामी निवडणुकीवर डोळा ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी जम्बो शहर कार्यकारिणी जाहीर केली. निवडणुकीपूर्वी संघटन बांधणीचा प्रयत्न ...

नागपूर : महापालिकेच्या आगामी निवडणुकीवर डोळा ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी जम्बो शहर कार्यकारिणी जाहीर केली. निवडणुकीपूर्वी संघटन बांधणीचा प्रयत्न करतानाच जुन्या कार्यकारिणीतील चार विधानसभा अध्यक्षांनाही बदलण्यात आले आहे.

शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत कार्यकारिणीची घोषणा केली. कार्यकारिणीत २८ महासचिव, ३४ उपाध्यक्ष, २८ सचिव, १४ संघटन सचिव व ३ सहसचिव नियुक्त करण्यात आले आहेत. ९ जणांना कार्यकारिणी सदस्य, तर तिघांवर प्रवक्तापदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्ष विस्तारासाठी सर्वांना सामावून घेण्याचा प्रयत्न करीत असतानाच जुन्या चार विधानसभा अध्यक्षांना बदलण्यात आले आहे. उत्तर नागपूरचे अध्यक्ष विशाल खांडेकर, पूर्वचे रवींद्र इटकेलवार, दक्षिणचे अशोक काटले व मध्य नागपूरचे मिलिंद मानापुरे यांना शहर कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. प्रवक्ता श्रीकांत शिवणकर यांच्यासह सतीश इटकेलवार, नूतन रेवतकर व संतोष सिंह हे नवे प्रवक्ते नेमले आहेत.

पक्षात आलेल्यांना संधी

- पेठे यांच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीत प्रवेश घेतलेल्यांना कार्यकारिणीत सामावून घेण्यात आले आहे. गुलशन मुनियार यांना पूर्व नागपूर अध्यक्ष योगेश न्यायखोर यांना कार्याध्यक्षपदी नियुक्त केले आहे. शिवसेनेतून आलेले रविनीश पांडेय व काँग्रेसमधून घरवापसी केलेले रमण ठवकर यांना उपाध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे.