शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल समर्थक प्रशांत राही, विजय तिरकीला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 21:08 IST

नक्षल चळवळीचा मास्टर मार्इंड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी. एन. साईबाबा (४८) याचे साथीदार प्रशांत राही नारायण सांगलीकर (५४) व विजय नान तिरकी (३०) यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी दणका दिला.

ठळक मुद्देहायकोर्ट : जन्मठेपेसह अन्य शिक्षेवर स्थगिती देण्यास नकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नक्षल चळवळीचा मास्टर मार्इंड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी. एन. साईबाबा (४८) याचे साथीदार प्रशांत राही नारायण सांगलीकर (५४) व विजय नान तिरकी (३०) यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी दणका दिला. जन्मठेपेसह अन्य शिक्षेवर स्थगिती व जामिनासाठी दोन्ही आरोपींनी दाखल केलेले अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व मुरलीधर गिरटकर यांनी हा निर्णय दिला.यासह अन्य आरोपी दहशतवादी कृत्याचा कट रचणे, दहशतवादी संघटनेला सहकार्य करणे, दहशतवादी संघटनेसाठी कार्य करणे इत्यादी गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी आढळून आले आहेत. ७ मार्च २०१७ रोजी गडचिरोली सत्र न्यायालयाने आरोपींना जन्मठेपेसह विविध वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्याविरुद्ध सर्व आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. त्यासोबत राही व तिरकी यांनी शिक्षेवर स्थगिती व जामीन मिळण्यासाठी अर्ज सादर केला होता. अन्य आरोपींमध्ये महेश करिमन तिरकी (२२), पांडू पोरा नरोटे (२७) व हेम केशवदत्ता मिश्रा (३२) यांचा समावेश आहे. प्रा. साईबाबा दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक होता. महेश तिरकी व नरोटे मुरेवाडा, ता. एटापल्ली (गडचिरोली), मिश्रा कुंजबारगल, जि. अलमोडा (उत्तराखंड), राही डेहराडून (उत्तराखंड) तर, विजय तिरकी धरमपूर, ता. पाखंजूर, जि. कांकेर (छत्तीसगड) येथील रहिवासी आहे. अर्जदारांतर्फे सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ अधिवक्ता नित्या रामकृष्णन तर, राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. प्रशांतकुमार सत्यनाथन व अ‍ॅड. शार्दुल सिंग यांनी बाजू मांडली.काय म्हणाले न्यायालयसत्र न्यायालयात शिक्षा झाल्यामुळे आरोपींच्या निर्दोषत्वाचा दावा संपुष्टात आला आहे. खटल्यावरील सुनावणीदरम्यान जामिनावर बाहेर असणे व शर्तींचा भंग न करणे या बाबी शिक्षेवर स्थगिती देण्याचा आधार ठरू शकत नाही. आरोपी नक्षल चळवळीसाठी कार्य करीत होते याचे पुरावे आढळून आले आहेत. यासंदर्भात पुराव्यांची साखळीही जुळून आली आहे. त्यामुळे जामिनावर सोडल्यास पोलिसांच्या हातात आलेले महत्त्वाचे दुवे नष्ट होतील. आरोपींनी केलेले गुन्हे गंभीर आहेत. ते गुन्हे व्यक्तीविशेषविरुद्ध नसून थेट केंद्र शासनाविरुद्ध युद्ध छेडण्याचा कट रचण्याचे आहेत. तसेच, आरोपींचे प्रकरण अपवादात्मक असल्याचे कुठेच दिसून आलेले नाही असे मत उच्च न्यायालयाने आरोपींना दणका देताना निर्णयात नोंदविले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnaxaliteनक्षलवादी