शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलबंदमुळे शेतीची कामे प्रभावित

By admin | Updated: July 30, 2014 01:16 IST

माओवादी संघटनांतर्फे २८ जुलै ते ३ आॅगस्ट या कालावधीत नक्षल शहीद सप्ताह साजरा केला जात आहे. या सप्ताह पाळण्याचे आवाहन नक्षल्यांनी जिल्हाभरात पत्रके टाकून केले आहे. त्यामुळे सोमवारपासून

बसफेऱ्या बंद : राज्य परिवहन महामंडळाला दररोज पाच हजाराचा फटकागडचिरोली : माओवादी संघटनांतर्फे २८ जुलै ते ३ आॅगस्ट या कालावधीत नक्षल शहीद सप्ताह साजरा केला जात आहे. या सप्ताह पाळण्याचे आवाहन नक्षल्यांनी जिल्हाभरात पत्रके टाकून केले आहे. त्यामुळे सोमवारपासून दुर्गम भागातील गावात शेतीची तसेच रोवणीची कामे बंद पडली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या दोन आगारांनी जवळजवळ २० बसफेऱ्याही बंद केल्यामुळे महामंडळाला दररोज ५ ते ६ हजार रूपयाच्या उत्पन्नाचा फटका बसत आहे. तसेच दुर्गम गावातील लोकांना दळणवळणाची सेवाही मिळणे कठीण झाले आहे. नक्षल्यांकडून शहीद सप्ताहादरम्यान घातपाताच्या कारवाया करण्याची शक्यता राहते. सप्ताहादरम्यान नक्षल्यांकडून बंदचे आवाहनही करण्यात आल्याने दहशतीमुळे नागरिक बंदमध्ये सहभागी होतात. या बंदमुळे धानोरा, कोरची, भामरागड, एटापल्ली, अहेरी या तालुक्यातील अतिदुर्गम भागातील रोवण्याचे काम सोमवारपासून नागरिकांनी बंद ठेवले आहेत. त्याचबरोबर राज्य परिवहन महामंडळाने धानोरा तालुक्यातील मुरूमगावच्या समोर छत्तीसगड राज्यात जाणाऱ्या आंतरराज्यीय बसफेऱ्या बंद केल्या आहेत. कुरखेडा तालुक्यातील पुराडा, चामोर्शी तालुक्यातील घोटपर्यंतच बसफेऱ्या नेण्यात येत आहेत. दुर्गम भागातील बसफेऱ्या सोमवारपासून बंदच ठेवण्यात आल्या आहेत. परिणामी प्रवाशांनाही बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागत आहे. एसटी महामंडळाला दिवसाचा ५ ते ६ हजार रूपयाचा फटका बसत आहे. काही भागात पोलीस स्टेशनला विचारणा केल्यानंतरच बसफेऱ्या पाठविण्यात येत आहेत, अशी माहिती आहे. (नगर प्रतिनिधी)